Tuesday, 12 December 2017

व्हॉट्सअॅपचा वापर नागरीकांचा जीव वाचवण्यासाठी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

तरुण पिढी सोशल मीडियावर  फक्त वेळ घालवते अशी ओरड नेहमीच होते असते. मात्र, नाशिकच्या काही तरुणांनी एकत्र येऊन व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून गरजूंचा जीव

वाचवण्याचा वसा घेतला.

 

ज्या गरजूंना रक्ताची गरज आहे अशांनी या व्हॉट्सअॅप ग्रुपवर रक्ताची मागणी करायची आणि त्यांना शक्य असेल तितक्या लोकांना रक्त पुरवले जाते.

 

आत्तापर्यंत जवळपास 20 ते 25 जणांचा जीव वाचवण्यात या तरुणांना यश आले. नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात याच व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून 

रक्तदान शिबीरही घेण्यात आले. या शिबिराला नाशिकसह औरंगाबाद, नगर जिल्ह्यातूनही उत्तम प्रतिसाद मिळाला.

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News