Wednesday, 23 January 2019

'बाहुबली थाळी'नंतर आता पुण्यात गाजतेय 'माहिष्मती थाळी'!

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

‘पुणे तिथे काय उणे’ असं कायमच म्हटलं जातं. याच खवय्यांच्या पुण्यात आता ‘सरपंच थाळी’, ‘बाहुबली थाळी’नंतर आता ‘माहिष्मती थाळी’ सध्या चर्चेचा विषय ठरतेय. स्टार्टर्सपासून ते पराठे आणि पंजाबी भाज्यांपासून ते लस्सीपर्यंत असे 30 हून अधिक पदार्थ या थाळीत मिळताहेत. माहिष्मतीच्या साम्राज्याप्रमाणे ही भव्य दिव्य थाळी सध्या आकर्षणाचा विषय ठरलीय.

पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरच्या ‘हाउसफुल पराठा’ येथे ‘बाहुबली थाळी’नंतर आता ‘महिष्मती थाळी’ आकर्षणाचा विषय ठरतेय. ब-याचदा आकारानं मोठी असलेली थाळी स्वादिष्ट आणि रुचकर असेलच असे नाही. पण महिष्मती थाळी त्याला अपवाद आहे.

काय काय आहे या थाळीमध्ये?-

स्टार्टर्स

रायता

पापड

अनेक प्रकारचे पराठे

नान

रोट्या

पंजाबी स्वादाच्या भाज्या

भाताचे दोन प्रकार

दोन-तीन प्रकारचे गोड पदार्थ

हे आहेत ‘महिष्मती’च्या साम्राज्यातील मेनू.

पूर्वी हाऊसफुलच्या बाहुबली आणि मिनी बाहुबली थाळीला तुफान प्रतिसाद मिळाला त्यानंतर मालक समीर सुर्वे आणि मुख्य शेफ राजू उस्ताद यांनी महिष्मती थाळीची निर्मिती केली असून, खवय्यांच्या सेवेसाठी ही थाळी रुजू झाली आहे.

एका भव्य थाळीमध्ये अनेक पदार्थ एकाचवेळी पद्धतशीरपणे ठेवले जात असतात. सर्व थाळी तयार करायला साधारण अर्धा तास आणि त्याची मांडणी करायला पंधरा मिनिटं असा साधारण 40 ते 45 मिनिटांचा कालावधी लागतो. बाहुबली थाळीमध्ये एकच मोठा पराठा असतो आणि भाज्या लहानशा वाटीमध्ये येतात. मात्र, महिष्मती थाळीमध्ये पराठे, नान आणि रोट्या यांचं बरंच वैविध्य आहे. शिवाय सर्व भाज्या बऱ्यापैकी मोठ्या भांड्यांमध्ये असतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिष्मती थाळी संपवणं हे खरोखर चॅलेंज आहे. थाळीचे नाव ऐकून आणि पदार्थांची लिस्ट बघूनच खवय्ये ही थाळी ऑर्डर करतात.

पुण्यामध्ये खवय्यांची कमतरता मुळीच नाहीय, त्यामुळे पुणेकरांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी अशा भन्नाट कल्पना लढवल्या जातात, सरपंच,बाहुबली थाळीनंतर महिष्मती थाळी पुणेकरांच्या पसंतीस उतरेल यात शंका नाही.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य