Wednesday, 23 January 2019

सर्वात जास्त पगार हवा आहे 'इकडे' जा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

हार्डवेअर अॅण्ड नेटवर्किंग, सॉफ्टवेअर अॅण्ड आयटी सर्व्हिसेस आणि कन्झ्युमर सेक्टरच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात लोकं पारंगत झाले आहेत. मात्र इतर क्षेत्रापेक्षा  या क्षेत्रात अधिक वेतन आहे हे क्वचितच लोकांना माहित आहे. या क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या लोकांना सर्वाधिक मागणी आहे. त्या लोकांना हवे तसे वेतनही मिळते.

'लिंक्डइन'नं पहिल्यांदाच देशात सर्वाधिक वेतनासंदर्भात सर्व्हे केला आहे. या सर्वेक्षणात देशात सर्वाधिक पगाराच्या नोकऱ्या या हार्डवेअर अॅण्ड नेटवर्किंग, सॉफ्टवेअर अॅण्ड आयटी सर्व्हिसेस आणि कन्झ्युमर सेक्टरमध्ये असून, सर्वाधिक पगार बेंगळुरूत मिळतो. त्यानंतर मुंबई आणि दिल्लीचा क्रमांक लागतो, असं समोर आलं आहे.

'आयटी हब' अशी ओळख असलेल्या बेंगळुरूत सर्वाधिक वेतन मिळते. त्यानंतर मुंबई आणि दिल्लीत नोकरदारांना सर्वाधिक वेतन मिळते, असं या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

  • हार्डवेअर अॅण्ड नेटवर्किंग या क्षेत्रातील नोकरदारांना - 15 लाख रुपये वार्षिक वेतन
  • सॉफ्टवेअर क्षेत्रातील नोकरदारांना - 12 लाख वार्षिक वेतन
  • कन्झ्युमर क्षेत्रातील नोकरदारांना - 9 लाख रुपये वार्षिक वेतन
loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य