Wednesday, 23 January 2019

हिवाळ्यात 'अशी' घ्या आरोग्याची काळजी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

पृथ्वीवरती विविध ऋतू आहेत, जसे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. या तीन ऋतूंमध्ये हिवाळा सर्वात उत्तम समजला जातो. हे ऋतू म्हणजे निसर्गाची अजब जादूगारीच... या बदलत्या ऋतूंचा अजब आणि अनोखा खेळ दरवर्षी, न चुकता पृथ्वीवर मांडला जातो.

आता थंडीला सुरुवात होत आहे. दिवाळी सुरु झाली की हिवाळा सुरू होतो तेव्हा फराळाचे पदार्थ अर्थात चकल्या, करंज्या, कडबोळी असे तळलेले पदार्थ खाऊ शकतात. ते पचनही होतात आणि त्यातली चरबी साठवली जाते.

हिवाळ्यात असे करा नियोजन -

रोज रात्री झोपताना एक ग्लास भरून दूध प्यावे आणि त्यात एक चमचा लोणकढे तूप टाकावे, म्हणजे झोपही चांगली लागते आणि तुपाच्या रुपाने पोटात चरबी साठते. अशाच पद्धतीने आयुर्वेदामध्ये निरनिराळ्या पद्धतीने तूप खाण्याचा सल्ला दिला जातो. दररोज सकाळी रिकाम्यापोटी एक चमचा तूप, एक चमचा पिठी साखर आणि थोडेसे मिरे एकवटून खावेत असेही आयुर्वेद सांगतो.

थंडीचा सगळ्यातआधी ओठांवर आणि त्वचेवर परिणाम दिसून येतो. त्वचा कोरडी पडणे, काळी पडणे असे प्रकार होत असतात. त्यामुळे थंडीच्या दिवसांत त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. मॉइश्चरायझ करणे, योग्य आहाराचे सेवन करणे अशा गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते.

थंडीत करा हे उपाय -

मुलायम ओठांसाठी: अनेकजण फुटलेल्या ओठांना पेट्रॉलियम जेली लावण्यापेक्षा व्हिटॅमिन ‘इ’ने युक्त असलेल्या ‘लिप केअर’ उत्पादनांचा वापर करावा. याच्या वापराने त्वचेतील ओलावा कायम राहाण्याबरोबरच सूर्याच्या दाहकतेपासून त्वचेचा बचाव होण्याबरोबरच चेहऱ्यावरील डार्क स्पॉट कमी होण्यासदेखील मदत होते.

त्वचेसाठी: थंडीत रुक्ष पडणाऱ्या त्वचेची चांगल्याप्रकारे काळजी घेण्यासाठी‘कोको बटर क्रिम’चा वापर करणे उत्तम राहील. या क्रिमच्या वापराने केवळ शरिराला सुगंधच प्राप्त होतो असे नाही, तर नियमित वापराने क्रीम खोलवर जात त्वचेचा मऊपणा कायम ठेवण्यास मदत होते.

आंघोळीपूर्वी ऑलिव्ह ऑइलने शरिराला हलक्या हाताने मसाज करणे. यामुळे शरिरातील मॉश्चर कायम राहाण्यास मदत होऊन त्वचा मऊ राहते. चेहऱ्यासाठी त्वचेतील ओलावा कायम ठेवणाऱ्या क्रिमची निवड करा.

पायांच्या भेगांवरील उपाय: पायांच्या भेगांना थंडीत शरीरातील ओलावा कमी होत असल्याने प्रामुख्याने त्वचेवर याचा विपरित परिणाम होतो. थंड हवामानाचा सर्वाधिक प्रभाव जाणवतो तो टाचांवर. पायांवरील भेगामुंळे काहींना तर चालणेदेखील कठीण होते. रात्री झोपण्यापूर्वी ग्लिसरिन आणि गुलाब पाण्याने रोज हलका मसाज घेतल्यास आश्चर्यकारक फरक जाणवेल.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य