Friday, 18 January 2019

‘या’ कारणामुळे 236 इंजिनियर्सची कंपनीतून हकालपट्टी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

पुण्यातील एका नामवंत कंपनीने आपल्या 200 हून अधिक इंजिनियर्सना कामावरून काढून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या कंपनीत कार्यरत असलेल्या 236 इंजिनियर्सना काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या इंजिनियर्सनी कंपनीला न सांगता सुट्टी घेतली असल्याचे मॅनेजमेंटने सांगितले. याबाबत कंपनीने एक पत्रकही प्रकाशित केलं आहे. एकाच वेळी 236 इंजिनियर्सना नोकरी गमवावी लागली असल्यामुळे कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या कर्मचाऱ्यांनी एकत्र सुट्टी घेतली असल्यामुळे कंपनीने ही कारवाई केली. या कर्मचाऱ्यांनी सुट्टीवर जाण्यापूर्वी कोणतीही नोटीस दिली नसल्याचा दावा कंपनीने केला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

  • कंपनी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे इंजिनियर्स मागील काही महिन्यांपासून कंपनीत कार्यरत होते.
  • 2 डिसेंबर 2017 ते 19 जानेवारी 2018 दरम्यान त्यांनी कंपनीला कोणतीही पूर्व कल्पना न देता सुट्टी घेतली होती.
  • ही एक जर्मन कंपनी असून या कंपनीची शाखा पुण्यात आहे तेथे हा प्रकार घडला आहे.
  • सुट्टीवरून आल्यानंतर येथील कर्मचाऱ्यांना सुट्टी घेण्याचे कारण विचारण्यात आले होते.
  • तसेच या इंजिनियर्सची चौकशी केली असता या चौकशीत कर्मचारीचं दोषी ठरले असल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
loading...

Top 10 News

राशी भविष्य