Friday, 18 January 2019

आता अॅमेझॉनवर होणार लघु-सूक्ष्म उद्योजकांच्या उत्पादनाची विक्री

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

राज्यातील लघु व सूक्ष्म उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी उद्योग विभागाने आज अॅमेझॉन या नामांकित कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तसेच अॅमेझॉन कंपनीचे मुख्य विपणन अधिकारी सतीश उपाध्याय यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

राज्यातील लघु उद्योजकांच्या उत्पादनांना स्थानिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे, तसेच देश-विदेशातूनही मागणी होत आहे.

ही बाब ओळखून महाराष्ट्रातील लघु, सूक्ष्म उद्योजकांनी तयार केलेल्या वस्तू आता अॅमेझॉनवर विक्रीसाठी लघु उद्योग महामंडळ व अॅमेझॉनमध्ये करार करण्यात आला आहे.

उद्योजकांसाठी विक्रीची माहिती व्हावी यासाठी अॅमेझॉनतर्फे स्वतंत्र पेज तयार करण्यात येणार आहे.

याशिवाय महिला उद्योजकांसाठी अमेझॉनने सहेली हा स्वतंत्र विभाग तयार केला असून याद्वारे आतापर्यंत सुमारे 85 हजार महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांची विक्री अमेझॉनवरून केली आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य