Friday, 18 January 2019

ऑनलाइन फूड ऑर्डर करताय? सावधान!

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

मुंबईत अन्न आणि औषध प्रशासनानं ११३ खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या दुकानांनर बंदी घातली. त्यांच्याकडे परवाने नसल्याचं उघड झालं आहे. तर काही ठिकाणी अत्यंत अस्वस्छतेत काम सुरू असल्याचं या कारवाईत दिसून आलं.

या 'स्विगी', 'फूडपांडा', 'झोमॅटो' यांसारख्या फूड चैन कंपन्यांकडून पुरवण्यात येणारे अन्न अतिशय घाणेरड्या अवस्थेत तयार होत असल्याचंही समोर आले आहे.

स्वस्त, झटपट आणि भरघोस डिस्काऊंटच्या नावाखाली ग्राहकांना अतिशय सुमार दर्जाचं अन्न पुरवत सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळण्याचाच हा प्रकार असल्याचे निदर्शनास आले आहे.

मुंबईच्या बहुतांश झोपडपट्ट्यांमधून अतिशय घाणेरड्या ठिकाणी तयार केलेले अन्न मुंबईभर पुरवठा होत असल्याचे समोर आलं आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं जी कारवाई केली, त्यात नागपूरमधील काही दुकानांचाही समावेश आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य