Monday, 10 December 2018

स्टारबक्सची 6 ऑक्टोबर रोजी 'ही' खास ऑफर!

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

भारतात प्रत्येक 'स्टारबक्स स्टोअर'मध्ये शनिवारी 6 ऑक्टोबर 2018 रोजी प्रत्येक ड्रिंक 100 रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहे. 'आंतरराष्ट्रीय कॉफी वीक' साजरा करण्यासाठी या शनिवारी ही ऑफर ठेवण्यात आली आहे.

'स्टारबक्स'मधील ड्रिंक्सच्या किमती या 500 रुपयांपेक्षा जास्त आहेत. मात्र शनिवारी ही पेयं केवळ 100 रुपयांत उपलब्ध असणार आहेत. स्टारबक्स इंडियाने ट्विटरद्वारे याची माहिती दिली आहे.#Starbucks100  #StarbucksBrewtober हे हॅशटॅग सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत.

स्टारबक्सने आपल्या ग्राहकांना अशा प्रकारची ऑफर याआधीही एकदा जाहीर केली होती. त्यावेळी तरुणांचा याला तुफान प्रतिसाद मिळाला होता. गेल्या वर्षी, आपल्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त स्टारबक्सने आपल्या महागड्या ड्रिंक्सची किंमत 100 रुपये इतकी कमी ठेवली होती. यावेळी लोकांनी स्टारबक्समध्ये जाण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. 

6 ऑक्टोबर रोजी मकाटिओस, कोल्ड ब्रू, सुपर स्मूथ नाईट्रो, जावा चिप आणि बऱ्याच प्रकारच्या कॉफी स्टारबक्स कॅफेमध्ये अवघ्या 100 रुपयांत मिळणार आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य