Friday, 14 December 2018

तुम्ही हेयर डायचा वापर करता का? मग हे नक्की वाचा.

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

केसांचं सौंदर्य आणखी खुलवण्यासाठी हेयर डायचा वापर सर्रास आजची पिढी करताना दिसतेय. बाजारात वेगवेगळ्या रंगाचे कलर उपलब्ध असतात. पण अशा प्रकारचे डाय प्रत्येकालाच सूट होतात असे नाही. काही आवड म्हणून केसांना कलर करतात. तर काही जण आपले सौंदर्य आणखी कसे खुलून दिसेल यासाठी मग साधा सरळ मार्ग अवलंबतात. खर्च ही कमी होतो. आणि घरच्या घरी हे उपाय करून पाहीले जातात.
पण हिच आवड महागातही पडू शकते. हे माहीत आहे का? हेयर डायच्या प्रोडक्टमध्ये केमिकलचा वापर केलेला असतो. यामूळे जळजळ, पूरळ, रॅशेस होण्याची शक्यता असते. अशा अॅलर्जीपासून वाचण्यासाठी काही घरगुती उपाय नक्की करून पाहा.

कोरफडीचा गर :- 
कोरफडीच्या गराचा वापर आपण चेहरा, केस, सर्दीसाठीही फायदेशीर आहे. या गराचा वापर अॅलर्जी झालेल्या जागी बोटांच्या साहाय्याने लावून ते 30 मिनिटे लावून ठेवा.

टी-ट्री ऑइल :-
हेयर डायमुळे तूमच्या स्काल्पला काही त्रास होत असेल तर टी-ट्री ऑइलचा वपर करू शकता. याने त्वचेची खाज आणि सूज कमी होण्यास मदत होते.

कडुलिंबाची पाने:- #hair#scalping#hairsalon#hairdye#skinallergy#remedies#Tips#beauty#HairFall#hairfalltreatment#hairfallinwinter
सहा ते आठ तास कडुलिंबाची पाने भिजत ठेवा. नंतर वाटून घ्या. अॅलर्जी झालेल्या भागाला 30 मिनिटे कडुलिंबाची पेस्ट लावून ठेवा.

लिंबाचा रस:-

दह्यामध्ये लिंबाचा रस मिसळून लावू शकतो. काळी मिरी आणि तुळशीची पाने वाटून घ्या. त्यामध्ये 1 चमचा ऑलिव्ह ऑइल, लसणाच्या दोन पाकळ्या, चिमुटभर मीठ टाका हे सर्व मिश्रण एकजीव करून अॅलजी झालेल्या भागाला 10 ते 15 मिनिटं लावा. नंतर धुवून टाका.

loading...

Top 10 News

राशी भविष्य