Wednesday, 19 December 2018

या सॅंंडलची किंमत ऐकाल तर थक्क व्हाल!

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

दुबईमध्ये एक महागडी सॅंडल लॉन्च करण्यात येणार आहे. ही सॅंडल जगातील सर्वात महागडी सॅंडल आहे. या सॅंडलची किंमत 1.23 अब्ज डॉलर्स इतकी आहे. जगातील या सर्वांत महागड्या सॅंडलची किंमत ही हातावर न मोजता येण्याइतपत आहे.

बुधवारी दुबईमध्ये जगातील सर्वात महागडे शूज 17 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या किंमतीत बाजारात येणार आहे. या शूजबद्दल खलीज टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या अहवालात हे शूज बनवण्यासाठी नऊ महिन्यांचा कालावधी लागला आहे. हे शूज खूप महाग असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे या शूजमध्ये हिरे आणि रियल सोन्यापासून ही लक्झरी फुटवेअर बनवण्यात आली आहे.

पॅशन डायमंड शूजच्या किंमती 62.4 दशलक्ष दिरहॅम म्हणजेच (17 दशलक्ष डॉलर्स किंवा 1.23 अब्ज डॉलर्स) इतकी आहे. या शूजमध्ये प्रत्येकी 15 कॅरेटचे डी-फ्लेलेसलेस हीरे आहेत.

पॅशन ज्वेलर्सच्या सहकार्याने संयुक्त अरब अमिरातस्थित ब्रँड जदा दुबईने तयार केलेल्या या शूजला 7 स्टार हॉटेल बुर्ज अल अरब येथे लॉन्च केले जाणार आहे. या आधीही असे महागडी शूज बनवण्यात आले होते. ते म्हणजे डेबी विंगम हाय हिल्स याची किंमत 15.1 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स तर (55.4 दशलक्ष दिरहॅम) इतकी होती.

"जदा दुबई हीरे सह फक्त शूज’’. आमच्या दुसऱ्या संग्रहाच्या प्रक्षेपणानंतर, आम्हाला अतिशय दुर्मिळ हिरे वापरुन जगात एक अद्वितीय वस्तू बनवायची होती. "जुदा दुबईचे सहसंस्थापक आणि सर्जनशील संचालक मारिया माजारी यांनी म्हटले आहे की, या कार्यक्रमासाठी 50 गेस्ट बोलवण्यात आले आहेत. त्यामध्ये व्हीआयपी, अल्ट्रा-हाय-नेट-लार्थ व्यक्ती आणि मीडियालाही आमंत्रित केले आहे.

माजारीच्या मते, या शूजची किंमत 17 दशलक्ष डॉलर्स निश्चित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात याची विक्री केली जाणार नाही. कारण या शूजची फक्त एकच जोडी बनवण्यात आली आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांच्या आकारात तयार केली जाईल असे माजारीचे म्हणने आहे.

जगातील पॅशन डायमंड शूजमध्ये फक्त एकच जोडी आहे. शूज तयार करण्यासाठी आम्हाला काही बारकावेसुध्दा जाणून घ्यावे लागले. म्हणजेच शूजला परिपूर्ण आकार, परिपूर्ण उंची, परिपूर्ण रंग शोधण्यासाठी आम्हाला इटलीमध्ये अनेक शूजचा आम्हाला अभ्यास करावं लागला. या शूजमध्ये जे लोगो बनवण्यात आले. ते लोगो देखील सोन्याचे बनवलेले आहेत. जे अगदी हलके आहे. जेणेकरून ते चालण्यासाठी खूप आरामदायक वाटतील, "अशी सर्व माहिती सह-संस्थापकांनी दिली आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य