Wednesday, 19 December 2018

आजच्या युवा पिढीसाठी कानमंत्र...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

आजची युवा पिढी ही दारूच्या विळख्यात प्रचंड बुडाली आहे, तर सोशल साईट्सवर 24 तास ठाण मांडून बसली आहे. मोबाईलशिवाय एक क्षणही दूर राहू शकत नाही.

मोबाईल, टिव्ही, बुफरवर मोठ-मोठया आवाजात गाणी ऐकणे. हा तर जणू छंदच म्हणावा लागेल. पण यामूळे बहिरेपण येऊ शकते बरे का?

रस्त्याने चालतांना देखील मोठया आवाजात गाणी ऐकणे. पण असे करणे हे धोकादायक ठरू शकते. कानात कॉड टाकल्याने आजूबाजूचा कसलाच आवाज न ऐकू येणे. त्यामूळे अनेकांना आपला जीव ही गमवावा लागला.

असे होऊ नये म्हणून पुढील 5 गोष्टींचा नीट विचार करा.

  • इयरफोन लावून मोठया आवाजात गाणी ऐकणे. परंतु अतितिक्ष्ण आवाजामूळे आपल्या कानाला हानी पोचू शकतो. यामुळे बहिरेपणा येऊ शकतो.
  • काहीजण घरीच आपला कान साफ करतात. यासाठी मग अगरबत्तीची काठी, पिन, हेयर पिन, माचिस असं टोकेरी वस्तू घालून कान साफ करतात. पण असे करणेही फार चुकीचे आहे.
  • काही वेळेस काठी, पिन कानाच्या पडद्याला लागल्यामूळे आपल्या कानाचे फार नुकसान होते. अशा वेळेस बहिरेपणाचे शिकार आपण बनू शकतो.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषध घेऊ नये. एंटीबायोटिकच्या अति सेवनाने देखील बहिरेपणाला सामोरे जावे लागते.
  • तसेच गाड्यांच्या प्रेशर हॉनमूळेपणदेखील आपण बहिरेपणाचे कारण ठरू शकतो.
  • डिजे व पबमध्ये वाजणाऱ्या कर्कश आवाजामूळे बहिरेपण उद्भवू शकतो.
loading...

Top 10 News

राशी भविष्य