Tuesday, 22 January 2019

घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

User Rating: 4 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

 

आयसीआयसीआय बँकेने सोमवारी तीस लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जांवरील व्याजदरात ०.३ टक्क्यांनी कपात केली. यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआयचे गृहकर्जांचे दर आता सारखे झाले आहेत.

 

तसंच एचडीएफसीनेही कर्जदर खाली आणले आहेत. त्यामुळे घर खरेदी करणे सोपे होणार आहे. हे दर कमी झाल्याने पगारदारांना गृहकर्ज कमी दराने मिळणार आहे.

 

खासगी बँकेच्या क्षेत्रातील हे दर सर्वांत कमी आहेत. महिला नोकरदारांना गृहकर्ज 8.35 टक्के दराने मिळणार असून इतरांना 8.40 टक्के दराने मिळणार आहे. एचडीएफसीनेही हेच दर ठेवले आहेत.

 

गेल्या आठवड्यात स्टेट बँक ऑफ इंडियाने गृहकर्जांवरील व्याजदरामध्ये पाव टक्का कपात केली होती. येत्या काळात इतर खासगी बँकाही गृहकर्जांवरील व्याजदर कमी करण्याची शक्यता आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य