Thursday, 17 January 2019

लवकरच बदलणार तुमची फेसबुक टाईमलाईन, मार्क जुकरबर्गने केली पोस्ट

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी मुंबई

फेसबुकमध्ये लवकरच काही बदल होणार आहेत. फेसबुक सध्या तुमच्या टाईमलाईनमध्ये दिसण्याऱ्या न्यूज फिडवर काम करत आहे. आता लवकरच तुम्हाला तुमच्या न्यूज फिडमध्ये लोकल बातम्या देखील दिसणार आहे.

 फेसबुकचे संस्थापक आणि सीईओ, मार्क जुकरबर्ग यांनी एका पोस्टद्वारे ही माहिती दिलेली आहे. मार्क जुकरबर्ग यांनी पोस्टमध्ये यूजर्सना सांगितले आहे की आता आम्ही तुम्हाला तुमच्या न्यूज फिडमध्ये तुमच्या शहरातील जास्तीत जास्त बातम्या तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

आणि जर तुम्ही कोणत्याही लोकल पब्लिशरला फॉलो करत असाल किंवा एखादी लोकल न्यूज शेअर करत असाल तर ते तुमच्या न्यूज फिडवर दिसेल. मार्क जुकरबर्ग यांनी सांगितले आहे की या लोकल पब्लिशरची ओळख त्याचा पेज फॉलो करणारे यूजर्स आणि त्या बातम्यांवर क्लिक करणाऱ्या यूजर्सच्या भौगोलिक स्थितिवरून ठरेल.  

 

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य