Friday, 18 January 2019

दाट, मजबूत, काळ्या, चमकदार केसांसाठी घरगुती उपाय

User Rating: 3 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

वाढत्या प्रदुषणामुळे आपल्या शरिरावर त्याचे अनेक परिणाम होत असतात, अर्थात ते सगळे परिणाम वाईटच असतात. दुसर म्हणजे बदलत्या वातावरणामुळे किंवा त्यात होणाऱ्या बिघाडांमुळे आपल्या आरोग्याला त्याचे पडसाद उमटतात. आपल्या आरेग्यावर परिणाम होतो म्हणजे नेमक काय होत? केस गळतात, केस कमजोर होतात, पांढरे पडतात, विरळ होतात, केसांत कोंडा होतो, वेगवेगळ्या ऍलर्जी होतात असे अनेक त्रास आपल्याला होतात.

केस का गळतात? याची कारणे

मानसिक त्रास : केस गळतीची सर्वात महत्त्वाचीबाब म्हणजे मानसिक त्रास. शाळकरी मुलांपासून ते प्रौढांपर्यंत आज सर्वांना या त्रासाला सामोरे जावे लागतेच. डोके दुखी, चक्कर येणे, चिडचिड होणे, अशक्तपणा, नैराश्य येणे, टेंशन येणे हे सगळे प्रकार घडायला सुरूवात होते. या सर्व प्रकारामुळे त्याचा परिणाम आपल्या केसांवर होतो व केसांचे गळणे सुरू होते तसेच कमजोर होतात व पांढरे पडतात.   

पाण्याची कमतरता : आपला पूर्ण दिवस धावपळीत निघून जातो. काहींना पाणी जास्त पिण्याची सवय नसते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक वाईट परिणामक बदल होत असतात. सुरूवातील ते दिसून येत नाहीत मात्रनंतर त्याचे परिणाम दिसून येतात. त्यामुळे दिवसातून 2-3 लिटर पाणी नियमीत प्यावे.

अपुरी झोप : दिवसभराच्या धावपळीनंतर गरजे पुरती झोप ही महत्त्वाची आहे. अपुऱ्या झोपेमुळे डोकेदुखी होते, चिडचिड होते, कामात लक्ष लागत नाही, कामात सतत चुका होत राहतात. झोप पूर्ण झाली नसेल तर त्याचा परीणाम आपल्या आरोग्यावर होतो आणि केसांचे गळणे सुरू होते.

शॅम्पू आणि तेलातील सतत होणारे बदल : सततचे शॅम्पू आणि तेलातील होणारे बदल यामुळे केस कमी व्हायला सुरूवात होते.  आपण नेहमी वेगवेगळे शॅम्पू आणि तेलाचा वापर करत असतो आणि जर ते आपल्या केसांना सूट नाही झाले तर आपले केस गळतात, केस कमजोर होतात, केस पांढरे पडतात, विरळ होतात.

वाढते प्रदुषण : धुळ, माती, वाहनांतून निघणाऱ्या धुरामुळे आपल्या केसांवर त्याचे वाईट परिणाम होत असतात. केस गळतात, कमजोर होतात, पांढरे पडतात, विरळ होतात. धुळ, माती, वाहनांतून निघणारा धूर हा केसात जातो व नियमीत केसांची काळजी न
घेतल्याने केस खराब होतात.

केसांवरील वेगवेगळे प्रयोग : केसांवर वेगवेगळे प्रयोग करताना अनेकदा केस फार गरम होतात. काही लोकांच्या केसांना वापरल्या जाणाऱ्या मशिनींचा गरमपणा सहन होत नाही. त्यामुळे केस कमजोर होतात. त्यामुळे केसांची गळती होते. आणि हळूहळू टक्कल पडू लागतो.

केसांच्या यासर्व समस्यांवर काही घरगुती उपाय देखील आहेत. ज्या घरी उपलब्ध असतात. बाहेरील वस्तूंचा वापर टाळावा कारण आज-काल त्यात देखील कॅमिकलसची भेसळ होत असते.

केस गळतीवर नियंत्रण कसे कराल?

कोरफड : सगळ्या समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे कोरफड. केसांच्या वाढीसाठी, मजबुतीसाठी, कोरफड अत्यंत उपयुक्त आहे. कोरफडमुळे केसांमधे वेगळीच चमक येते. कोरफडीच्या नियमीत वापरामुळे केसांच्या सर्व समस्या दूर होतात.त्यासाठी कोरफडीमधील गाभा वापरावा.

नारळाचे तेल : केसांच्या वाढीसाठी तसेच त्याच्या देखभालीसाठी नारळ अतिशय उपयुक्त आहे. नाराळातील उपयुक्त मेद ,प्रोटिन्स व मिनरल्स केसांचे तुटण्याचे प्रमाण कमी करते. केस गळती रोखण्यासाठी नारळाचे दुध वा तेल अतिशय उपयुक्त ठरते.

कडीपत्ता : पांढ-या होणा-या केसांसाठी कडीपत्ता खुप चांगला मानला जातो. आंघोळीच्या पाण्यात एक तास अगोदर काही कडीपत्त्याचे पाने टाकून केस धुवा. हा प्रयोग नियमित केल्याने तुमचे पांढरे केस नक्की काळे होतील. तसंच यामध्ये आयर्न आणि फॉलिक अॅसिडची पर्याप्त मात्रा असते. आहारात याचे प्रमाण वाढवल्यास पांढरे केस लवकर काळे होऊ लागतील.

दूध : दररोज एक ग्लास दूध घेतल्यास प्रोटीन आणि कॅल्शिअम मिळेल. यामुळे केस चमकदार आणि मजबूत होण्यास मदत मिळेल. गायीच्या दूधानेही पांढरे केस काळे होऊ शकतात. गाईचे दूध केसांमध्ये लावल्याने नैसर्गिकरित्या केस काळे होतात. आठवड्यातुन एकदा हा प्रयोग केल्यास लवकरच तुमचे पांढरे केस काळे होतील

अंड : अंड्यातील अनेक घटक केस गळतीवर किफायतशीर आहेत. त्यातील सल्फर, फॉसफरस , आयोडीन, झिंक घटक केसांच्या वाढीस मदत करतात.

कांदा-लसूण : कांद्यातील सल्फर केसांच्या वाढीसाठी मदत करते. कांद्याचा रस टाळूवर लावल्याने केसगळतीवर नियंत्रण मिळवता येते. कांद्याप्रमाणेच लसूण मध्येही ‘सल्फर’चे घटक असतात म्हणूनच पारंपारिक केस वाढीच्या औषधांमध्ये याचा वापर केल्याचे प्रामुख्याने आढळून येते.

मेथीदाणे : यामध्ये आयर्न आणि फायबरचे पर्याप्त प्रमाण असते. रात्रभर मेथीदाणे पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी रिकाम्यापोटी हे पाणे प्यावे किंवा याने केस धुवावेत.

आवळा : केस गळतीने त्रस्त असलेल्यांसाठी ‘आवळा’ नक्कीच फायदेशीर ठरतो , त्यातील व्हिटामिन सी व एन्टीऑक्सिडन्ट गुण सुरवातीच्या टप्प्यातील केसगळती थांबवते. आवळ्याचाअर्क अथवा पावडर लिंबाच्या रसात एकत्र करा. हे मिश्रण केसांना लावून सुकू द्या केस कोमट पाण्याने धुऊम घ्यावे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य