Friday, 18 January 2019

माळशेज घाटाचे सौंदर्य खुलवण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाचे एक पाऊल पुढे

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

माळशेज घाटाचे नैसर्गिक सौंदर्य हे फक्त महाराष्ट्रातील लोकांपुरतचं मर्यादित न ठेवता आता भारतभर पसरवण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने एक नव पाऊल उचलले आहे. या नव्या विचाराने देशभरातील पर्यटकांना आनंदाचा धक्का बसणार आहे. ठाणे जिल्हा प्रशासनाने माळशेजचं सौंदर्य हे अधिक खुलवण्यासाठी हालचाली सुरु आहेत.

या पारदर्शक पूलामुळे पर्यटकांना हवेत चालण्याचे एक नवा थ्रिल अनुभवता येणार आहे. खोल दरीचा नयनरम्य नजारा पाहता येईल आणि अर्थात डेकवर काळजी घेऊन फोटो काढण्याचीही मुभा असेल.

malsej-ghat.jpg

माळशेज घाटातील 700 मीटर खोल दरीवर 18 मीटर लांबीचा पारदर्शक वॉक-वे बांधण्याचा प्रस्ताव ठाणे जिल्हा प्रशासनाने मांडला आहे. प्रस्ताव आणि बजेटला मंजुरी मिळाल्यास येत्या तीन वर्षांत हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले जाईल.

दोन टप्प्यात ही योजना प्रत्यक्षात आणली जणार आहे. पहिल्या टप्प्यात वॉक वेचं बांधकाम, तर दुसऱ्या टप्प्यात आर्ट गॅलरी, अॅम्पिथिएटर, म्युझिकल फाऊण्टन्स याची रचना केली जाणार आहे. आमदार किसन कथोरे यांनी हा प्रस्ताव मांडला असून ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे.

malshej-ghat3.jpg

माळशेज घाट पावसाळ्यात पर्यटकांनी फुललेला असतोच मात्र, वॉक वे बांधल्यावर वर्षाचे 365 दिवस इथे पर्यटकांची गर्दी होईल.तसेच, जिल्ह्याच्या महसूलात वाढही होईल आणि जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळही विकसित होईल, असं दुहेरी उद्दिष्ट आहे.

malshej-ghat4.jpg

loading...

Top 10 News

राशी भविष्य