Friday, 18 January 2019

अमृता फडणवीस यांचा नवा पंजाबी म्युझिक अल्बम लॉंच

User Rating: 2 / 5

Star ActiveStar ActiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र

अमृता फडणवीस यांचा पहिला पंजाबी भाषिक म्युझिक अल्बम लॉंच झाला आहे. स्वत: अमृता फडणवीस यांनी याची माहिती ट्विटरवरील पोस्ट द्वारे दिली आहे.

अमृता फडणवीस यांनी या अल्बममध्ये पंजाबी/बॉलिवूड मिक्स गाणी गायली आहेतता त्याच्या चाबत्याना पहेयला मिळणार आहेत. यू-ट्यूबवर रिलीज झालेल्या या गाण्याने लाखो प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या पंजाबी अंदाजाचं सोशल मीडियावर कौतुक ही होत आहे.

amruta-fadanvis.png

आपल्या ट्विटर अकाऊंवर हा व्हिडीओ शेअर करताना अमृता फडणवीस यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'पाहा आणि ऐका धम्माल गाणं साड्डी गली/रेल गड्डी'. दरम्यान, अमृता फडणवीस यांनी याआधी हिंदी अल्बममध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं आहे.

'साड्डी गली/रेल गड्डी' असं अमृता फडणवीस यांच्या पंजाबी अल्बमचं नाव आहे. टी-सीरिजकडून सुमारे चार मिनिटांचा हा अल्बम रिलीज केला आहे. अल्बममध्ये पंजाबी गायक दीप मोनी आणि प्रीत हरपाल यांनी अमृता फडणवीस यांच्यासोबत आपला आवाज दिला आहे.

amruta-fadanvis2.pngloading...

Top 10 News

राशी भविष्य