Wednesday, 19 December 2018

माउंट एवरेस्टलाही झाकून टाकेल एवढा मोठा वेडींग ड्रेस

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 वेगवेगळ्या स्टाईलचे वेगवेगळे वेडींग ड्रेस आपण पाहिलेच असतील पण फ्रांसमध्ये एक असा वेडिंग ड्रेस तयार करण्यात आला आहे. ज्याला पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. फ्रांसमधला हा वेडिंग ड्रेस जगातला सर्वात लांबलचक वेडिंग ड्रेस आहे. जो माउंट एवरेस्टला झाकून टाकेल.

फ्रांसच्या या वेडिंग ड्रेसची नोंद गिनीज वर्ल्‍ड रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. हा वेडिंग ड्रेस सफेद रंगाचा असून याची लांबी 8095.40 मीटर इतकी आहे.

जो जगात सर्वात मोठा पर्वत असलेल्या माउंट एवरेस्टला झाकून टाकेल. हा ड्रेस डायनॅमिक प्रोजेक्‍ट्सने तयार केलेला आहे. हा ड्रेस तयार करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागला आहे.

आणि 15 कारागीरांनी याचे काम केले आहे. या गिनीज रेकॉर्डनंतर या ड्रेसची विक्री करण्यात येणार आहे. आणि त्यातून आलेली रक्कम समाजसेवा संस्थेला दान केली जाईल.         

loading...

Top 10 News

राशी भविष्य