Thursday, 22 February 2018

दात दुखीने हैराण आहात; डॉक्टरकडे जाण्याची भिती वाटतेय? हे घरगुती उपाय केल्यास 100 टक्के आराम मिळेल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई 

 

केमिकलयुक्त टुथपेस्ट किंवा चुकीच्या खाद्यपदार्थांमुळे दात दुखणे, दात किडणे,व इतर अनेक समस्या निर्माण होतात. अनेकजण दातांच्या समस्यांनी हैराण आहेत. डॉक्टरकडे जाण्याआधी काही घरगुती उपाय केल्यास दातांच्या समस्यांपासून आराम मिळू शकतो

दातांना या समस्यांपासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक उपाय केले करु शकता. हे उपाय तुमच्या दातांना फक्त चमकदारच नाही बनवत तर तुमच्या दातांना दातासंबंधित सर्व समस्यांपासून दूर ठेवतात.

कडुलिंब, बाभूळ, तुळशी असे काही हर्बल उपाय आहेत. 

 

तुळशी

दातांच्या समस्या दूर करण्याकरिता तुळशीचे अनेक फायदे आहेत. दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी तुळशीची पाने उन्हात सूखवून घ्यावेत आणि त्याची पावडर बनवून घ्यावी.

ही पावडर टूथपेस्टमध्ये मिक्स करून ब्रश केल्याने दात चमकदार बनतील.

याशिवाय संत्र्याचे साल आणि तुळशीची पाने उन्हात सुखवून त्याची पावडर बनवून घ्यावी.

रोज ब्रश केल्यानंतर या पावडरने दातांची मसाज करावी यानेदेखील दातांचा पिवळेपणा दूर होईल.

 

कडुलिंब

कडुलिंबाची पावडर म्हणजे दातांसाठी वरदानच आहे. कडुलिंब हा अतिशय उपयुक्त उपाय आहे.

तोडांची दुर्गंधी दूर करण्यासाठी कडुलिंबाच्या पावडरचा वापर करावा. कडुलिंब दातांच्या सर्व समस्या दूर करते. कडुलिंब दातांना किडण्यापासून वाचवते.

 

बाभूळ

जर हिरड्यांमधून रक्य येत असेल तर बाभूळच्या सालीचा काढा बनवून घ्यावा आणि दिवसातून तीन वेळा गुळणी करावी. दात किडत असतील तर बाभुळच्या सालीचा काढा बनवून त्याने गुळणी करावी. बाभूळची साल, पाने आणि फुले एकत्रित करून त्याचे चूर्ण बनवून घ्यावे आणि त्या चूर्णाने रोज दात घासावेत त्याने तुमचे दात निरोगी राहतील.

 

 

Top 10 News

Facebook Likebox

Popular News