Thursday, 18 January 2018

9 महिने नव्हे तर तब्बल 15 वर्षे होते भ्रूण तिच्या पोटात

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर

 

मनुष्याने विकासाचे कितीही दावे केले तरी निसर्ग कधी काय धक्का देईल, याचा अंदाज बांधता येणे अशक्य आहे. वैद्यकीय जगताला अचंबित करणारे असेच एक प्रकरण नागपुरात पहायला मिळालंय.

एका महिलेच्या शरीरात 9 महिने नव्हे तर तब्बल 15 वर्षे भ्रूण होता. आश्चर्याची बाब म्हणजे हा भ्रूण गर्भाशयात नव्हे तर पोटात होता.

इतकी वर्षे शरीरात राहिल्याने भ्रूणाचे शरीर टणक झाले होते. वैद्यकीय परिभाषेत याला ‘स्टोन बेबी’ असे संबोधण्यात येते. शहरातील ‘लॅप्रोस्कोपिक सर्जन’ डॉ.नीलेश जुननकर यांच्या प्रयत्नांमुळे संबंधित महिलेला 15 वर्षांच्या यातनेपासून मुक्तता मिळालीये. 

Top 10 News

Facebook Likebox

Popular News