Thursday, 22 February 2018

स्वाइप मशीनमुळे बँकाना सहन करावा लागणार 3,800 कोटींचा भुर्दंड

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

 

बँकाना स्वाइप मशीनमुळे 3,800 कोटींचा भुर्दंड सहन करावा लागणार असल्याचं प्रतिपादन एसबीआयनं केले.

 

याबाबतचा अहवालही एसबीआयनं जारी केला. कार्ड स्वाइप मशीनमधील गुंतवणुक अधिक आहे.

 

मात्र, त्यातून मिळणारा महसूल अत्यल्प असल्यामुळे हा फटका बँकांना बसणार आहे. असं एसबीआयने म्हटले. एसबीआयच्या अहवालानुसार जुलैमध्ये 15 लाखांपेक्षा जास्त कार्ड स्वाइप मशीनचे जाळे देशभरात होते.

 

नोटबंदीनंतर मशीनच्या संख्येत जवळपास दुपटीनं वाढ झाली आणि कार्ड स्वाइप मशीनची संख्या 28 लाख 4 हजारावर गेली.

Top 10 News

Facebook Likebox

Popular News