Tuesday, 12 December 2017

नोकरी बदलणाऱ्या पीएफ खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

चाकरमान्यांसाठी एक खुशखबर आहे. आता नोकरी बदलली तरी भविष्य निर्वाह निधी म्हणजे पीएफ खातं नव्या कंपनीत आपोआप फिरवलं जाणार आहे.

 

यानुसार तुमचं पीएफ अकाऊंट आता आधार कार्डशी जोडलं जाणार आहे. आता जर नोकरी बदलली तर अर्जाशिवायच कर्मचाऱ्याचे पैसे तीन दिवसांत ट्रान्सफर होतील. आणि जर कर्मचाऱ्याकडे आधार आयडी असेल तर तो देशात कुठेही नोकरीसाठी गेला. तरी त्याचं पीएफ खातं ट्रान्सफर होईल.

 

प्रॉव्हीडंट फंड प्रक्रीया सोपी करण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे नव्या कंपनीत पुन्हा नव्याने पीएफ खातं फिरविण्याची गरज नाही. तर लवकरच यानिर्णयाची अंमलबजावणी केली जाईल अशी माहिती मुख्य पीएफ आयुक्त व्ही. पी जॉय यांनी दिली.

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News