Wednesday, 23 January 2019

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांना गुगलचे डुडलद्वारे अभिवादन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची आज जयंती आहे, यानिमित्त गुगलने बाबा आमटे यांना खास डुडलद्वारे अभिवादन केले आहे. या खास डुडलमध्ये बाबा आमटे यांनी केलेल्या समाजकार्याचा आढावा या गुगलकडून घेण्यात आला आहे.

मुरलीधर देवीदास आमटे म्हणजे बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी चंद्रपूरमध्ये आनंदवन आश्रम सुरू केला. गांधीवादी विचारांनी प्रेरीत असलेल्या बाबा आमटे यांनी समाजातून डावललेल्या कुष्ठरोगींची सेवा सुरू केली. श्रीमंत घराण्याची पार्श्वभूमी असलेल्या बाबा आमटे यांनी वयाच्या विशीतच वकिली व्यवसाय सुरू केला होता. मात्र, एका कुष्ठरोगीला पावसात भिजताना त्यांचे मन हेलावून गेले होते. त्यानंतर त्यांनी कुष्ठरोगींसाठी आयुष्य वाहून घेतले.

बाबा आमटे यांनी सामाजिक चळवळीतही सक्रीय सहभाग नोंदवला होता. एवढेच नव्हे तर वन्यजीव संरक्षणासाठीही त्यांनी पुढाकार घेतला होता. बाबा आमटे यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांमुळे त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलने बाबा आमटे यांचे महान समाजकार्य लक्षात घेऊन त्यांच्यासाठी हे खास डुडुल साकारलं आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Wed Jan 23 04:46:03 +0000 2019

आज 23-01-2019 काय आहे आपलं आजचं राशीभविष्य? वाचा- https://t.co/7m8MsWa9bs #Bhavishya #jyotish #astrology… https://t.co/Ermv6ISpkM
Jai Maharashtra News
Tue Jan 22 17:12:09 +0000 2019

पुण्याची शान आणि महाराष्ट्राचा अभिमान असणारा शनिवार वाडा झाला २८७ वर्षांचा... https://t.co/IGzs6RYkBv #Pune… https://t.co/6nbisn1aFP