Wednesday, 23 January 2019

ख्रिसमसनिमित्त Googleने बनवले एक सुंदर doodle

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जगभरात आज म्हणजेच 25 डिंसेबर रोजी ख्रिसमस हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आजच्या दिवशी मोठ्या उत्साहात घरोघरी ख्रिसमसची लगबग पाहायला मिळते, गोडधोड पदार्थांची रेलचेल तसेच आकर्षक सजावट करण्यासाठी सर्वच गुंतून जातात तर चर्चेसमध्येही आकर्षक सजावट केली जाते.

आजचा हाच दिवस साजरा करत गुगुलने ख्रिसमसनिमित्त खास डूडल तयार केले आहे. या डूडलमध्ये 2 खुर्च्यांवर सांताक्लॉज बसले आहेत. तसेच गुगुलच्या स्पेलिंगमधील L या अक्षराजागी एक सुंदर ख्रिसमस ट्री तयार करण्यात आली आहे, आणि विशेष म्हणजे या डूडलवर क्लिक करताच ‘हॅपी हॉलिडेज’ असं लिहलेलं आपल्याला पाहायला मिळतं.

Googleचं हे डूडलल खुपच सुंदरपणे सजवण्यात आलं आहे. तसेच यामध्ये सांताक्लॉजसोबतच गिफ्ट बॉक्सही पाहायला मिळत आहेत. ख्रिसमस हा दिवस जीसस क्राइस्ट यांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Wed Jan 23 04:46:03 +0000 2019

आज 23-01-2019 काय आहे आपलं आजचं राशीभविष्य? वाचा- https://t.co/7m8MsWa9bs #Bhavishya #jyotish #astrology… https://t.co/Ermv6ISpkM
Jai Maharashtra News
Tue Jan 22 17:12:09 +0000 2019

पुण्याची शान आणि महाराष्ट्राचा अभिमान असणारा शनिवार वाडा झाला २८७ वर्षांचा... https://t.co/IGzs6RYkBv #Pune… https://t.co/6nbisn1aFP