Wednesday, 23 January 2019

आता इन्स्टावर 'हे' नवे फीचर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

इंस्टाग्रामने त्याच्या अॅपमध्ये नवीन फीचर आणले आहे. व्हाट्सअॅप व्हॉईस मॅसेजनंतर हा दुसरा पर्याय उपलब्ध झाला आहे. 

या नव्या फीचरमुळे आपण इंस्टाग्रामद्वारे व्हॉइस मॅसेज पाठवू शकणार आहे. यासाठी, इंस्टाग्राम अॅपमध्ये एक मायक्रोफोन बटण जोडला गेला आहे. हे बटण दाबून आपण व्हाट्सअॅपप्रमाणे इंस्टाग्राममधूनही व्हॉइस मॅसेज पाठवू शकणार आहोत. 

तुम्ही व्हाट्सअॅप प्रमाणे, मायक्रोफोन बटण दाबून इन्स्टाग्राममध्ये एकदा व्हॉइस मॅसेज रेकॉर्ड करून आपल्या फ्रेंडसला पाठवू शकता. हा मॅसेज प्राप्तकर्ता WAV फाइल स्वरूपात जातो, जो कोणत्याही म्युजिक प्लेअरला सपोर्ट करु शकतो. ही फाईलही व्हाट्सअॅपप्रमाणे पुन्हा-पुन्हा ऐकू शकतो.

हे नवे फीचर वापरण्यासाठी अशी करा प्रक्रिया - 

  • Instagram च्या या फीचरचा वापर करण्यासाठी, आपल्याला प्रथम आपल्या इन्स्टाग्राम अॅपला अपडेट करावे लागेल. 
  • आपण Google Play Store वरुन अपडेट करण्यासाठी डाउनलोड करू शकता तर आयफोन वापरकर्ते अॅप स्टोअर वरुन डाउनलोड करू शकता. 
  • आपले इन्स्टाग्राम अॅप अपडेट केल्यानंतर, कोणतेही चॅट उघडावे.
  • यानंतर माइक बटण दाबून ठेवावे. आपला व्हाॅइस मॅसेज माइक बटण धरताच रेकॉर्डिंग सुरू होईल.
  • व्हॉइस मॅसेज रेकॉर्ड केल्यानंतर, माइक बटणावरुन आपले बोट काढून टाका. हे केल्यानंतर, आपण SEND बटण क्लिक करताच आपला मॅसेज आपल्या मित्राला मिळेल.
  • जर आपण चुकून एकच मॅसेज दोनवेळा पाठवला तर त्या मॅसेजला लाॅंग प्रेस करून तो डिलीटही करता येतो.
loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Tue Jan 22 17:12:09 +0000 2019

पुण्याची शान आणि महाराष्ट्राचा अभिमान असणारा शनिवार वाडा झाला २८७ वर्षांचा... https://t.co/IGzs6RYkBv #Pune… https://t.co/6nbisn1aFP
Jai Maharashtra News
Tue Jan 22 16:51:57 +0000 2019

राहुल गांधी उत्तर प्रदेशातील जागा सोडून नांदेडमधून लढणार? नांदेड काँग्रेससाठी सर्वांत सुरक्षित मतदारसंघ? काय आहे या… https://t.co/kIrairDeOW