Friday, 14 December 2018

खुशखबर, जिओचा वर्ष समाप्तीला धमाका

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जिओ नेहमीचं वेगवेगळ्या धमाकेदार आॅफर देत असतो. सणासुदीला ग्राहकांना आॅफर्स देऊन आकर्षित करण्याची कला फक्त जिओकडेच आहे. मात्र यावेळी वर्ष समाप्तीला जिओने आपल्या ग्राहकांसाठी आॅफर दिली आहे.

वर्षाच्या शेवटच्या महिन्यात दिलेल्या या आॅफरचा जिओ ग्राहकांना भरपूर लाभ मिळणार आहे.

काय आहे आॅफर?

 • Jio ने आपल्या ग्राहकांसाठी सादर केली कॅशबॅक ऑफर
 • ऑफरनुसार ग्राहकाला कोणत्याही रिचार्जवर 100 टक्के कॅशबॅक मिळेल.
 • या कॅशबॅक ऑफरचा लाभ ग्राहक My Jio अॅपवरून घेऊ शकतात.

ही आॅफर 'अशी' मिळवा -

 • ग्राहकांनी सगळ्यात आधी आपल्या स्मार्टफोनवर My Jio अॅप डाऊनलोड करावे.
 • त्यावर लॉग इन करावे.
 • नंतर ते ओपन करून Recharge ऑप्शनवर क्लिक करावे.
 • यानंतर आपला आवडीचा रिचार्ज प्लान निवडून त्यावर क्लिक करावे.
 • नंतर Buy हे बटन दाबावे.
 • दरम्यान, कॅशबॅक व्हाऊचरसाठी मॅन्युअली अप्लाय करावे लागेल.
 • यासाठी Apply Discount Voucher वर क्लिक करावे.
 • नंतर व्हाऊचर सिलेक्ट करून USE IT हे बटन दाबावे.
 • यादरम्यान तुम्हाला पेमेंट ऑप्शन दिसेल.
 • तुमचा पेमेंट ऑप्शन निवडून ट्रान्झॅक्शनची प्रक्रिया करू शकतात.

Jio ची कॅशबॅक ऑफर 149, 198, 299, 349, 398, 448, 449, 498, 509, 799, 999, 1699, 1999, 4999 आणि 9999 रुपये रिचार्ज व्हाऊचरवर उपलब्ध आहे.

या‍शिवाय कंपनीने एक वर्षाची वैधता असलेला प्लान लॉन्च केला आहे. त्यात 100 टक्के कॅशबॅक अर्थात ग्राहक एक महिना भर फ्री कॉलिंगसह डेटाही वापरु शकता.

Jio च्या या प्लानची किंमत 1699 रुपये आहे. वैधता 365 दिवस आहे. या ग्राहकांना प्रतिदिन जीबी हायस्पीड डेटा, प्रतिदिन 100 मेसेज आणि अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळेल. यासोबतच ग्राहकांना सर्व प्रीमियम अॅप्सचा वापर मोफत करता येईल.

loading...

Top 10 News

राशी भविष्य