Friday, 14 December 2018

व्हाट्सअॅप घेऊन आलं ‘हे’ नवं मॅसेजिंग फिचर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

लोकप्रिय मॅसेजिंग अॅप व्हाट्सअॅपमध्ये एक नवीन फिचर आले आहे. या फिचरद्वारे यूजर्सना व्हाईस मॅसेजिंगचा नवा अनुभव घेता येणार आहे. व्हाट्सअॅपमध्ये व्हाईस मॅसेजचा फिचर आहे ज्यामुळे आपण आपला व्हाईस रेकॉर्ड करून समोरच्या व्यक्तीला सेंड करु शकतो. आतापर्यंत आपल्याला आलेला प्रत्येक व्हाईस मॅसेज एक-एक करून ऐकावा लागत होता. पण आता आलेल्या या नव्या फिचरमुळे असे करावे लागणार नाही. उदारणार्थ जर आपल्याला 5 व्हाईस मॅसेज आले तर एक व्हाईस मॅसेज ऐकल्यानंतर दुसरा मॅसेज ऐकण्यासाठी आपल्याला पुन्हा व्हाईस मॅसेजवर क्लिक केल्यानंतरच तो मॅसेज ऐकता येतो. 

पण व्हाट्सअॅपमध्ये आलेल्या या नव्या फिचरमुळे आता आपल्याला आलेला व्हाईस मॅसेज प्ले केल्यावर इतर मॅसेज आपोआप प्ले होतील. प्रत्येकवेळी तुम्हाला मॅसेजवर क्लिक करावं नाही लागणार. हे नवीन फिचर सध्या व्हाट्सअॅपच्या स्टेबल वर्जनमध्ये उपलब्ध करण्यात आलेले नाही पण व्हाट्सअॅपच्या नव्या अपडेटसह हे फिचर उपलब्ध होईल. या फिचरला Consecutive Voice Message म्हटले जात आहे.

व्हाट्सअॅप अपडेटनंतर एक व्हाईस मॅसेज प्ले केल्यावर दुसरा मेसेज प्ले होण्याआधी तुम्हाला एक टोन ऐकायला येईल ज्यामुळे तुम्हाला पहिला मॅसेज बंद झाल्याचे समजेल. या फिचरद्वारे आता व्हाईस मॅसेजिंगचा वापर आणखीन सोपा होणार आहे. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य