Friday, 14 December 2018

आता फेसबुकवर तयार करा मजेशीर व्हिडीओ, फेसबुकचं नवं अॅप लाँच

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

फेसबुक आपल्या युजर्ससाठी नेहमी काही नवीन फीचर्स आणत असते. यावेळी फेसबुकने आपल्या युजर्सचे व्हिडीओ आणखी मजेशीर करण्यासाठी एक व्हिडीओ अॅप लाँच केलं आहे. या नव्या व्हिडीओ अॅपमध्ये अनेक मजेदार फिल्टर्स आणि इफेक्ट्सचा फेसबुकने समावेश केला आहे. या अॅपमुळे युजर्स अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने हवे तसे मजेदार व्हिडीओ तयार करु शकतात.

फेसबुकने 'लासो' (Lasso) नावाचे एक भन्नाट अॅप लाँच केले आहे. या अॅपच्या माध्यमातून युजर्स एखादा छोटा मजेशीर व्हिडीओ झटपट तयार करून सोशल मीडियावर शेअर करू शकतात. या व्हिडीओमध्ये एडिटींग टूलच्या मदतीने युजर्स टेक्स्ट आणि म्युझिकचाही वापर करू शकतात. हेच या अॅपचे वैशिष्ट्य आहे. युजर्सना या अॅपचा वापर अॅन्ड्रॉईड आणि आयओएसवर करता येणार आहे.

लासो अॅपचा वापर करण्यासाठी सर्वात आधी फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लॉग इन करणं गरजेचं आहे. तसेच या अॅपच्या माध्यमातून करण्यात आलेले व्हिडीओ फेसबुक स्टोरीजमध्ये शेअर करता येणार आहे.

फेसबुकचे प्रोडक्ट मॅनेजर एंडी हुआन यांनी फेसबुकचं नवं लासो हे व्हिडीओ अॅप अमेरिकेमध्ये असल्याचं ट्विट केलं आहे. हे अॅप सर्वत्र कधी उपलब्ध होणार याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

loading...

Top 10 News

राशी भविष्य