Tuesday, 20 November 2018

31 आॅक्टोबरपासून पैसे काढण्यासाठी नव्या मर्यादा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

स्टेट बॅंक आॅफ इंडियाच्या खातेधारक आणि एटीएम धारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. एसबीआयने 31 आॅक्टोबर 2018 पासून एटीएममधून पैसे काढण्याची नवीन मर्यादा ठरवली आहे.

आता एसबीआयचा क्लासिक आणि मास्ट्रो डेबिट कार्डधारक 31 आॅक्टोबरपासून दिवसाला फक्त 20 हजार रुपये काढू शकणार आहेत. तर एटीएममधून दिवसाला 40 हजार रुपये पैसे काढण्याची मर्यादा आहे, मात्र 31 आॅक्टोबरनंतर क्लासिक आणि मास्ट्रो डेबिट कार्डधारक दिवसाला 20 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे काढू शकणार नाहीत. 

एसबीआयने आपल्या सर्व शाखांना याबाबतचे निर्देश दिले आहेत. तसंच एसबीआयच्या इतर कार्डसाठी हे नियम लागू होणार नाहीत.

यासुद्धा बॅंकांनी ठेवल्यात पैसे काढण्याची मर्यादा-

एचडीएफसी बॅंक -

 • प्लेटिनम चिप डेबिट कार्डमधून दिवसाला 1 लाख रुपये काढू शकतो.
 • टाइटेनियम रॉयाल डेबिट कार्डमधून दिवसाला 75 हजार रुपये काढू शकतो.
 • ईज़ी शॉप डेबिट कार्डमधून दिवसाला 25 हजार रुपये काढू शकतो.
 • ईज़ी शॉप टाइटेनियम डेबिक कार्डमधून दिवसाला 50 हजार रुपये काढू शकतो.

अॅक्सिस बॅंक

 • रूपे प्लेटिनम कार्डमधून दिवसाला 40,0000 रुपये काढण्याची मर्यादा ठेवली आहे.
 • अॅक्सिस बॅंकेच्या वेबसाइटनुसार वीजा टाइटेनियम प्राइम प्लस आणि सिक्योर प्लस डेबिट कार्डमधून दिवसाला 50 हजार रुपये काढू शकतो.

पीएनबी - पंजाब नेशनल बॅंक

 • प्लेटिनम आणि रूप डेबिट कार्डमधून दिवसाला जास्तीत जास्त 50 हजार रुपये काढण्याची सुविधा देत आहे.
 • बॅंकेच्या वेबसाइटनुसार याच्य़ा क्लासिक रूपे कार्ड आणि मास्टर डेबिट कार्डमधून दिवसाला ग्राहक जास्तीत जास्त 25 हजार रुपये काढू शकतो.

आईसीआईसीआई बॅंक

 • बॅंकेच्या वेबसाइटनुसार याच्य़ा एटीएममधून दिवसाला 50 हजार रुपये काढू शकतो.
 • प्रिविलेज बॅंकिंग टाइटेनियम डेबिट कार्डमधून दिवसाला 1 लाख रुपये काढू शकतो.
 • स्मार्ट शॉपर गोल्ड डेबिट कार्डमधून दिवसाला 75 हजार रुपये काढू शकतो.इसके तसंच वेबसाइटनुसार वीजा सिग्नेचर डेबिट कार्डमधून दिवसाला 1.5 लाख रुपये काढू शकतो.

बॅंक ऑफ बरोदा

 • रूपे क्लासिक कार्डमधून दिवसाला 25 हजार रुपये काढू शकतो.
 • तर या मास्टर प्लेटिनम कार्डमधून दिवसाला 50 हजार रुपये काढू शकतो.
 • रूपे प्लेटिनम कार्डमधून दिवसाला 50 हजार रुपये काढू शकतो.
 • याच्या वीजा इलेक्ट्रॉन कार्ड आणि मास्टर क्लासिक कार्डमधून दिवसाला 25 हजार रुपये काढू शकतो.

बॅंकेच्या एटीएम ट्रांजेक्शनमध्ये होणाऱ्या फसवणूकीच्या घटना लक्षात ठेऊन तसंच डिजिटल-कैशलेस ट्रांजेक्शन वाढवण्यासाठी ही पैसे काढण्याची मर्यादा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

यामध्ये क्लासिक आणि मेस्ट्रो प्लेटफॉर्मवर वापरत असलेले डेबिट कार्डमधूनही पैसे काढण्याची मर्यादा ठेवण्यात आली आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य