Monday, 10 December 2018

जेव्हा इंस्टाग्राम बंद झालं...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

फोटोंसाठी लोकप्रिय असलेला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम (Instagram) अचानक बंद पडला होता, तेही तासभर... आणि त्यामुळे इंस्टाग्राम युजर्स काही काळ हैराण झाले होते.

जगभरातील इंस्टाग्राम युजर्सला Instagram अॅप उघडण्यात समस्या येत होती. हे केवळ मोबाईल अॅपवरच नव्हे तर वेबवर देखील काम बंद होते. इंस्टाग्राम युजर्सने इंस्टाग्राम चालत नसल्याची गंमतीशीर तक्रार ट्विटरवर  केली आहे.

अलीकडेच 5 कोटी फेसबुक वापरकर्त्यांचे अकाऊंट हॅक झाल्याची माहिती समोर आली होती, जी फेसबुकच्या इतिहासातील सर्वात मोठी डेटा चोरी आहे. यानंतर फेसबुकने सुरक्षा पॅचही जारी केले होते.

फेसबुकच्या बाबतीत जे घडलं ते इंस्टाग्रामबाबत तर झालं नसावं अशी भीती सर्वत्र होती. मात्र तासाभरानंतर इंस्टाग्राम पुन्हा चालू झाल्याने सर्वांनी मोकळा श्वास घेतला.

फेसबुकनंतर लोकं सर्वात सक्रिय Instagram वर आहेत. भारतात सुमारे 70 कोटी लोक Instagram वर सक्रिय आहेत. Instagram बंद झाल्यानंतर, लोकं Twitter वर गंमत करू लागले होते. अशा प्रकारे Twitter वर instagram बंद झाल्याचा शोक व्यक्त केला आहे. हे पाहून आपण देखील हसाल...

loading...

Top 10 News

राशी भविष्य