Monday, 10 December 2018

अॅपलच्या नवीन आयफोनकडे ग्राहकांनी फिरवली पाठ

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

अॅपलचे नवे आयफोन आणि आयफोन XS ची मागणी भारतात कमी झाल्याचे समोर आले आहे.

भारतातील अनेक विक्रेत्यांनीही ही गोष्ट मान्य केली आहे. विकेंड सेलला निम्म्यापेक्षा कमी फोनची विक्री होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

यापूर्वी आयफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या रांगा लागलेल्या असायच्या, मात्र यावेळी वेगळचं चित्र पाहायला मिळत आहे.

अॅपलने लाखोंच्या संख्येने भारतामध्ये युनिट पाठवले आहेत,जेणेकरुन फोनची विक्री करताना कोणताही तुटवडा निर्माण होणार नाही.

मात्र यावेळी विक्रीही वाढलेली नाही आणि ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे.

अॅपल प्रीमियम रिसेलरचे देशभरात जवळपास 1500 स्टोअर्स आहेत, या कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मते, या स्टोअर्समध्ये 40 ते 50 टक्के स्टॉक विक्रीविना पडून आहे.

गेल्या वर्षी लाँच झालेल्या आयफोन 8 ची मागणी या वर्षीच्या मॉडेल्सपेक्षा अधिक प्रमाणात आहे.

यावेळी भारतात आयफोन XS आणि XS मॅक्सची विक्री केवळ 50 ते 60 टक्के झाली, जी गेल्या वर्षीच्या आयफोन X ची केवळ 3 दिवसात झाली होती.

अॅपलने आयफोन XS आणि XS मॅक्स गेल्या शुक्रवारी भारतात लाँच केला, तर गेल्या वर्षी लाँच झालेल्या आयफोन X ची किंमत 89 हजार रुपयांपासून ते 1.02 लाखापर्यंत होती.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य