Wednesday, 19 December 2018

‘व्होडाफोन’ची ऑफर... 4 महिने इंटरनेट ‘फ्री’!

User Rating: 2 / 5

Star ActiveStar ActiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

मोबाइल कंपन्यामधील स्पर्धा आता अटीतटीची व्हायला लागली आहे. मात्र ग्राहकांना त्याचा चांगलाच फायदा मिळतोय.

रिलायन्सच्या ‘जिओ गिगा फायबर'ने या क्षेत्रातील सगळी गणितंच बदलून टाकली.

आता ‘जिओ’ला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनने नवी शक्कल लढवली आहे. आपल्या ग्राहकांना चार महिन्यांसाठी चक्क फ्री इंटरनेटची ऑफर व्होडाफोनने आणली आहे.

काय आहे ही ऑफर?

  • जर तुम्ही वर्षभराचं सबस्क्रिप्शन एकदम घेतलं, तर पुढच्या 4 महिन्यांसाठी तुम्हाला इंटरनेट फुकट मिळणार आहे.
  • व्होडाफोनच्या वेबसाइटवरून यासाठी तुम्ही रिचार्ज करू शकता.
  • या ऑफरसाठी UPGRADE33 हा प्रोमोकोड देण्यात आला आहे.
  • विशेष म्हणजे 4 महिन्यांचं हे सबस्क्रिप्शन 12 महिन्यांत विभागण्यात आलंय,त्यामुळे जर तुम्ही वर्षभराचं सबस्क्रिप्शन घेण्याऐवजी जर तुम्ही 6 महिन्यांसाठी जरी प्लॅन घेतला, तरी तुम्हाला 2 महिन्यांसाठी फ्री सब्सक्रिप्शन मिळेल.
  • पण या प्लॅनसाठी 30 सप्टेंबरपूर्वी रिचार्ज करावं लागणार आहे.
  • जिओ गिगा फायबर आपल्या ग्राहकांना 3 महिन्यांसाठी 300 जीबी डेटा फ्री देत आहे.
  • या स्पर्धेत ग्राहक खेचण्यासाठी व्होडाफोनने 4 महिने फ्री इंटरनेट सुविधा पुरवण्याची ऑफर आणली आहे.
  • या मोबाइल कंपन्यांच्या साठमारीत ग्राहकांची मात्र चैन होतेय.
loading...

Top 10 News

राशी भविष्य