Thursday, 15 November 2018

आपल्या खास नवीन फीचरसह वीवो Vivo Y83 Pro भारतात लाँच

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

तुम्हाला जर तुमच्या बजेटमध्ये बसणारा स्वस्तात मस्त स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर आता तुम्हाला हवा असणारा स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन बाजारात उपलब्ध झाला आहे. वीवो कपंनीने नुकताचं Vivo Y83 Pro हा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे.

हा स्मार्टफोन वीवोने या वर्षीच्या सुरुवातीला लाँच केलेल्या Vivo Y83 चा अपग्रेडेड वर्जन आहे. मात्र वीवोच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

Vivo Y83 मध्ये सिंगल रिअर कॅमेरा होता तर Vivo Y83 Pro मध्ये डुअल कॅमेरा देण्यात आला आहे.

ViVo Y83 Pro हा स्मार्टफोन 8.1 ओरियो बेस्ड फनटच OS 4.0 वर चालतो तसेच या स्मार्टफोनमध्ये 19.9 रेश्यो आणि डिसप्ले नॉचसह 6.22-इंच HD+ फुलव्यू 2.0 IPS डिस्प्ले देण्यात आला आहे.

ViVo Y83 Pro चे फिचर

  • 19.9 रेश्यो आणि डिसप्ले नॉचसह 6.22-इंच HD+ फुलव्यू 2.0 IPS डिस्प्ले
  • या स्मार्टफोनमध्ये 4GB चे रॅम देण्यात आले आहे
  • प्राईमरी कॅमेरा 13 मेगापिक्सल तर सेंकेडरी कॅमेरा 2 मेगापिक्सल
  • फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सल तसेच AI ब्यूटी फिचर
  • इंटरनल मेमरी 64GB
  • फोनची बॅटरी 3260mAh
  • किंमत 15,990 रु.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य