Wednesday, 19 December 2018

व्हॉट्सअॅपचं ग्रुप व्हिडीओ कॉलिंग फिचर आता सर्वांसाठी उपलब्ध...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी व्हॉट्सअॅप एक मस्त फिचर घेऊन आलं आहे. ज्यामुळे तुम्ही एकाच वेळी तुमच्या ग्रुप फ्रेंडससोबत गप्पा मारु शकणार आहात. व्हॉट्सअॅपने आजपासून ग्रुप व्हिडीओ कॉलिंग फिचर सुरू केलं आहे.

या फिचरमुळे तुम्हाला एकाचवेळी तुमच्या इतर मित्र मैत्रीणींसोबत संवाद साधता येणार आहे. याआधी व्हॉट्सअॅपनं ऑडिओ कॉलिंग फिचर सुरू केलं होतं. 

जगभरातील आयओएस आणि अँड्रॉईड युजर्स आता या नव्या फिचरचा वापर करु शकतात. व्हॉट्सअॅप ग्रुप कॉलिंगच्या माध्यमातून एकाच वेळी 4 व्हॉट्स अॅप युजर्स व्हिडीओ चॅट करु शकतात.

हा ग्रुप व्हिडीओ कॉलिंग फिचर वापरण्यासाठी इंटरनेटचा वेग जास्त असावा लागतो.

मात्र व्हॉट्स अॅपवरुन ग्रुप व्हिडीओ कॉलिंग करण्यासाठी हायस्पीड इंटरनेटची आवश्यकता भासणार नाही, असं व्हॉट्स अॅपनं जाहीर केलं आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य