Wednesday, 19 December 2018

व्हॉट्सअॅपचं नवं फिचर, आता करता येणार नाही मेसेज फॉरवर्ड...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

नुकताच व्हॉट्सअॅपवरील फेक मेसेजमुळे काही खळबळजनक घटना घडल्या आहेत ज्यामुळे अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

तसेच व्हॉट्सअॅपवरील फेक मेसेजमुळे अनेकजण कोणत्याही माहितीशिवाय त्या मेसेजवर विश्वास ठेवतात.

या सर्व घटनांना लक्षात घेता फेक न्यूजवर आळा घालण्यासाठी भारत सरकारने धाडलेल्या नोटीसनंतर व्हॉट्सअॅपतर्फे ठोस पाऊलं उचलण्यात आलं आहे.

यामुळे भारतीयांच्या व्हॉट्सअॅप वापरातून एक फिचर कायमचे काढून टाकण्यात येणार आहे.

भारतीयांसाठी मेसेज पाठवण्याची मर्यादादेखील ठरवून देण्यात आली आहे.

त्यामुळे भारतीय युजर्सना आता क्विक फॉरवर्ड बटणाचा उपयोग करता येणार नाही. मीडिया मेसेजच्या ऑप्शननंतर क्वीक फॉरवर्डचे ऑप्शन येते.

मात्र युजर्सना आता याचा वापर मर्यादित करता येणार आहे. व्हॉट्सअॅपने केवळ भारतीयांसाठीच हे बदल केले आहेत.

फेक न्यूजवर आळा घालण्यासाठी भारत सरकारने धाडलेल्या नोटीसनंतर व्हॉट्सअॅपतर्फे ठोस पाऊल

  • भारतीयांसाठी मेसेज पाठवण्याची मर्यादादेखील ठरणार
  • भारतीय युजर्सना आता क्विक फॉरवर्ड बटणाचा उपयोग करता येणार नाही
  • केवळ भारतीय युजर्ससाठीचं व्हॉट्सअॅपचा हा बदल
loading...

Top 10 News

राशी भविष्य