Tuesday, 22 May 2018

व्हाट्सअॅपवर येणाऱ्या या मेसेजपासून सावधान !

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

या चेंडूला हात लावू नका नाहीतर मोबाइल हँग होईल असा मेसेज सध्या व्हॉट्सअपवर व्हायरल होत आहे. हा मेसेज खोटा नसून या चेंडूला हात लावल्यास आपलं व्हाटसअॅप खरंच हँग होतं आणि मोबाइल फोन देखील काही काळासाठी फ्रीज होतो, जे यूज़र्स अन्ड्रोइड फोनचा वापर करतात त्यांनी या मेसेज पासून सावध राहण्याची गरज आहे, कारण या मेसेजमुळे तुमच्या फोनला धोका आहे. व्हॉट्सअॅप हँग होण्यासाठी हा डॉट हे एकमेव कारण नसून, टेक्स्ट आणि डॉट यांच्यात एक स्पेस आहे.

जेव्हा हा मेसेज HTML मध्ये बदलण्यात आला तेव्हा दिसून आलं, की टेक्स्टमध्ये राईट टू लेफ्ट मार्क आहे. हा एक अदृश्य पद्धतीचा फॉरमॅट आहे, ज्याला लेफ्ट टू राईट आणि राईट टू लेफ्ट या अंतराने वापरलं जाऊ शकतं. युझर्स जेव्हा इंग्रजी टेक्स्टचा वापर करतात, तेव्हा LRM म्हणजे लेफ्ट टू राईट दिशेने फॉरमॅटिंग कॅरेक्टरचा वापर होतो. मात्र, व्हॉट्सअॅपमध्ये याचा वापर RLM म्हणजेच राईट टू लेफ्ट पद्धतीने केला जातो. यामुळे तुमचं व्हॉट्सअॅप हँग किंवा क्रॅश होतं.

(जय महाराष्ट्रचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करू शकता.)

 

loading...

Top 10 News

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Mon May 21 15:59:22 +0000 2018

दंगलकारण... ग्राऊंड झिरो... https://t.co/FFhWkNrpjw
Jai Maharashtra News
Mon May 21 15:57:26 +0000 2018

फेरीवाल्यांचा फेरा... https://t.co/afKg0YkRmr