Monday, 23 July 2018

व्हॉट्सअॅपसाठी, मुलीनं सोडलं घर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

आजच्या काळात सोशल नेटवर्किँग साइड्स म्हणजे युवापिढीच्या आयुष्यातील एक महत्वपूर्ण भाग झाला आहे. दैनंदिन जीवनातील प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टी त्यांना सोशल मिडीयावर शेअर करायच्या असतात. व्हॉट्सअॅपच्या जास्त वापरामुळे पालक रागावले म्हणून मुलींने घरातूनचं पळ काढला. अशी अचंबित करणारी घटना अंबरनाथमध्ये घडली आहे.

अंबरनाथच्या पश्चिम भागात राहणारी एक अल्पवयीन मुलगी आपल्या कॉलेजमधील मित्रांसोबत फिरायला गेली होती. तिथून आल्यावर व्हॉट्सअॅपवर ती मित्रमैत्रिणींचे फोटो पाहत होती. त्यामुळे मुलीची आई तिच्यावर रागावली. याच रागातून या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने घरातून पळ काढला. ही मुलगी नवी मुंबई येथे एका महिलेला भयभीत अवस्थेत आढळली होती. महिलेने विचारपूस केली असता, मुलीने आईवडिलांकडे जायचे असल्याचे सांगितले, महिलेने या मुलीला नवी मुंबई येथील एपीएमसी पोलिस ठाण्यामध्ये नेले. पोलिसांनी या मुलीची चौकशी केली असता, ही मुलगी अंबरनाथ येथील राहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

नवी मुंबई पोलिसांनी तात्काळ अंबरनाथ पोलिस ठाण्याशी संपर्क करत याबद्दल माहिती दिली आणि अंबरनाथ पोलिसांकडे तिला सुरक्षित सोपवले, अंबरनाथ पोलिसांनी मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन केले. नवी मुंबईतील महिलेची सर्तकता आणि पोलिसांच्या दक्षतेमुळे ही मुलगी सुखरुप तिच्या पालकांकडे पोहचली. मात्र व्हॉट्सअॅप वापराच्या या क्षुल्लक कारणावरून पालक रागावल्याने मुलीने थेट घरातून पलायन केल्याने सोशल मीडियाच्या वापराबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

loading...

Top 10 News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Mon Jul 23 05:05:04 +0000 2018

#हेडलाइन मेघा धाडे ठरली मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वाची विजेती...हा विजय माझ्या चाहत्यांचा...विजयानंतर मेघाची पहि… https://t.co/vU9pPixXJd
Jai Maharashtra News
Mon Jul 23 05:03:24 +0000 2018

#हेडलाइन मुंबईतल्या धारावीत अल्पवयीन मुलाचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप...सायन हॉस्पिटलम… https://t.co/lilchBc8U0

Facebook Likebox