Sunday, 20 January 2019

फ्रंट कॅमेरा 25 मेगापिक्सेल, ओप्पोचा जबरदस्त F7 स्मार्टफोन लवकरच होणार लॉंन्च

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

ओप्पो कंपनी आपला 'F7' स्मार्टफोन लवकरचं बाजारात आणणार आहे. या स्मार्टफोनचं वैशिष्ट्य त्याचा 25 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

ओप्पोने 'F7' स्मार्टफोनच्या लॉन्चिंगसाठी विशेष तयारी केली असून कंपनी अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर त्याचं प्रोमोशन करत आहे. 26 मार्च रोजी मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमात 'ओप्पो F7' स्मार्टफोन लॉन्च केला जाणार आहे. या स्मार्टफोनचा ब्रँड अॅम्बेसिडर, टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्या असेल.

या स्मार्टफोनच्या फीचर्सबाबत कोणतीच माहिती उघड करण्यात आली नाही. टिझर पाहून जाणकारांच्या अंदाजानुसार या स्मार्टफोनची 6.2 इंच एचडी स्क्रिन असण्याची शक्यता आहे. स्नॅपड्रॅगन 670 प्रोसेसर किंवा मीडियाटेक हेलियो पी 6 चिपसेट, 4 जीबी किंवा 6 जीबी रॅम, 64 जीबी स्टोरेज इत्यादी फीचर्स असू शकतात. या स्मार्टफोनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस ब्यूटीफिकेशन टेक्नोलॉजी असेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या फीचर्सच्या साहाय्याने युजर्सना फोटोसोबत अनेक प्रकारचे प्रयोग करता येतील. तसचं सेल्फीचा बॅकग्राउंन्ड ब्लर करता येऊ शकेल. टीझरवरुन या स्मार्टफोनची आयफोन-एक्सशी तुलना केली जात आहे.

 

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Sun Jan 20 06:05:53 +0000 2019

केनियाच्या कॉसमस लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद तर महिला गटात इथियोपियाच्या अलेमूने मारली बाजी वाचा सविस्… https://t.co/rB8tlwDKWd
Jai Maharashtra News
Sun Jan 20 04:59:23 +0000 2019

आज 20-01-2019 आपलं आजचं राशीभविष्य जाणून घेण्यासाठी करा पुढील लिंकवर क्लिक- https://t.co/TP16sWCONv #zodiacsigns… https://t.co/qieehbdJFm