Friday, 19 January 2018

एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल चार कॅमेरे असलेला जबरदस्त स्मार्टफोन लाँच

User Rating: 1 / 5

Star ActiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुबंई

 

मोबाईल कंपनी हुवाईनं Honor 9i हा स्मार्टफोन भारतामध्ये लाँच केला आहे. या नव्या फोनमध्ये अनेक वेगवेगळी फिचर्स देण्यात आली आहेत. याआधी हुवाईनं सप्टेंबरमध्ये मायमँग 6 चीनमध्ये लाँच केला होता.

Honor 9i या स्मार्टफोनमध्ये फ्रंट आणि रियर पॅनलमध्ये दोन-दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. त्यामुळे या फोनमध्ये एकूण चार कॅमेरे आहेत.

या स्मार्टफोनमध्ये असलेला फुलव्हिजन डिस्प्ले कॅमेरा इतर फोनपेक्षा वेगळा आहे. Honor 9i या स्मार्टफोनची किंमत 17,999 रुपये एवढी आहे. हा स्मार्टफोन सध्या ई कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवरच उपलब्ध आहे.

14 ऑक्टोबरपासून फ्लिपकार्टवर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Honor 9i चे बेस्ट फिचर्स

- 5.9 इंचांची स्क्रीन

- मेटल बॉडीचा डिस्प्ले

- 16 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचे सेंसर कॅमेरे

- कॅमेरा सेटअप व्हर्टिकल आहे आणि एलईडी फ्लॅश 

- सेल्फीसाठी 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचे फ्रंट कॅमेरे

- 4GB रॅम 

- 2.36 गिगाहर्ट्सचा ऑक्टो-कोर किरीन 659 प्रोसेसर

- इनबिल्ट स्टोरेज 64GB

- 3340 mAhएवढी बॅटरी

 

Top 10 News

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Fri Jan 19 11:25:21 +0000 2018

सरकारी योजनांची माहिती फक्त एका क्लिकवर - पाहा #JMVideo https://t.co/LOl33qpPK7
Jai Maharashtra News
Fri Jan 19 11:16:21 +0000 2018

बसमध्ये पँट फाटली म्हणून पुणेकर प्रवाशाने थेट पोलिस ठाण्यात तक्रार केली - पाहा #JMVideo https://t.co/3yevD8ZcK3 @PuneriSpeaks