Monday, 18 June 2018

मोबाईल क्रमांकाला आधार कार्ड जोडण्याची नवीन ट्रिक

User Rating: 3 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

केंद्र सरकारने मोबाईल क्रमांकाला आधार कार्ड जोडणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी ६ फेब्रुवारीपर्यंत मुदत देऊ केली आहे. आता काही मिंटात तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक आधार कार्डला जोडू शकता. आधार कार्ड जोडण्यासाठी तिम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वरून 14546 या क्रमांकावर कॉल करावा लागेल. त्यावर दिलेल्या सूचनांचं पालन केल्यावर अगदी कुठेही न जाता घर बसल्या तुमच्या मोबाईलला आधार क्रमांक जोडला जाऊ शकतो.

कसं जोडाल मोबाईल क्रमांकाला आधार कार्ड

1.प्रथम तुमच्या फोनवरून १४५४६ हा क्रमांक डायल करा.

२.योग्य पर्यायाची निवड केल्यानंतर तुमचे नागरिकत्व विचारलं जाईल.

३.त्यानंतर १ क्रमांक दाबून मोबाईल क्रमांक आधारला जोडण्याची परवानगी द्या.

४.त्यानंतर बारा अंकी आधार क्रमांक टाकून त्यापुढे निश्चित करण्यासाठी १ दाबा.

.तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी क्रमांक येईल. तो स्क्रीनवर टाइप करा.

६.मोबाईल ऑपरेटर तुमची मंजुरी घेऊन तुमच्या आधार कार्डवरून तुमचे नाव, फोटो आणि जन्मतारीख आदी माहितीची खातरजमा करतो.

७.तुमच्या मोबाईल क्रमांकाची खात्री करण्यासाठी आयव्हीआर मोबाईल क्रमांकाचे शेवटचे चार क्रमांकांची मागणी करतो.

८. जर, तुमचा क्रमांक योग्य असेल तर एसएमएसद्वारे ओटीपी पाठवला जातो.

९. आता १ क्रमांक दाबून आधार आणि मोबाईल क्रमांकाच्या पुनर्पडताळणीची खात्री करा.

१०. जर तुमच्याकडे दोन मोबाईल क्रमांक असतील तर, दोन्ही क्रमांक टाइप करा. त्यानंतर आयव्हीआरकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करा.

loading...

Top 10 News

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Mon Jun 18 08:56:02 +0000 2018

#FifaWorldCup2018 मेक्सिकोकडून जर्मनीचा धक्कादायक पराभव... - https://t.co/9mAXC0GTSi #FifaWorldCup18… https://t.co/PlJvgd1E93
Jai Maharashtra News
Mon Jun 18 07:31:42 +0000 2018

#FifaWorldCup2018 फिफा विश्वचषक स्पर्धेत सर्बियाचा 1 - 0 ने विजय... - https://t.co/XT52Uv4bFh #FifaWorldCup2018… https://t.co/2lNztUhA5P

Facebook Likebox