Sunday, 23 September 2018

2017चं सोशल मीडिया

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय मबाराष्ट्र न्यूज, मुंबई

1969 मध्ये इंटरनेटचा शुभारंभ झाल्याच्या 26 वर्षानंतर 15 ऑगस्ट 1995 रोजी भारतात इंटरनेट सुरू झाला. विदेशी कम्युनिकेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने त्यांच्या भारतीय दूरध्वनी यंत्राद्वारे जगातील संगणकांना भारतीय संगणकांशी जोडून इंटरनेटची सुरुवात केली.

 २०१७ मध्ये झालेल्या सगळ्यात जास्त डेटा वापरणाऱ्या देशात भारत आघाडीवर असल्याच समोत आलयं. एवढंच नाहीतर लोकं टीव्ही कमी पण मोबाईलमध्ये वापरतात असं 'इंडिया इंटरनेट ट्रेन्डस 2017' च्या रिपोर्टमध्ये समोर आलयं. आता लवकरच भारतात फाईव्ह जी सुरू होणार असल्याच्याही चर्चा आहेत.

'इंडिया इंटरनेट ट्रेन्डस 2017' च्या रिपोर्टनुसार, भारतीय एका आठवड्यात फक्त चारच तास टीव्ही बघतात. मात्र हेच भारतीय एका आठवड्यात २८ तास मोबाईलचा वापर चॅटिंग,कॉलिंग आणि सर्फिंगसाठी करतात.

भारतात जवळपास 35.5 कोटी इंटरनेट युजर्स असल्याचा दावा हा रिपोर्ट करतो. या युजर्सची संख्या दर वर्षी 28 % नी वाढते आहे. हे युजर्स डेटा वापरातील 45% वेळ मनोरंजनासाठी तर 34% वेळ सोशल मीडिया,सर्चिंग आणि इतर गोष्टींसाठी वापरतात.

इंटरनेटवर टाइमपास करणाऱ्यांची संख्या 45 कोटींपेक्षाही जास्त वाढलीये. भारत पुढील तीन वर्षांत डिजिटायझेशन आणि इंटरनेट ग्राहकांची संख्या वेगाने वाढत आहे. म्हणजे 2021मध्ये ही संख्या 82.9 कोटी होईल असा अंदाज लोवलो जातोय.

फेसबुक

लोकं फेसबुकवर लाईव्ह व्हिडिओ करताय. टेक्स्टसह इमेज शेअर करतात. आता तर फेसबुकवर एखादी वस्तूही विकता येणार आहे. विशेष म्हणजे फेसबुक युजर्सची संख्या आता 200 कोटींवर पोहोचली आहे.

लाडाचे व्हॉटस्अॅप

सर्वांच्या लाडाचे अॅप म्हणजे व्हॉटस्अॅप. वापरण्यास सोप आणि दैनदिन जिवनातला महत्वाचा घटक. म्हणूनच व्हॉट्सअॅपने वेळोवेळी बदल करून सर्व वापरकर्त्यांना नेहमी आर्कशीत केल. व्हाईस कॉल, व्हिडिओ कॉल, माय स्टेटस सुविधा देऊन व्हॉटस्अॅपने एक पाऊल पुढे टाकले. ग्रुपमध्येही व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलची सुविधा उपलब्ध करून दिली. तसंच  चुकून गेलेला एखादा मेसेज,फोटो,व्हिडिओ वापस म्हणजे डिलिट करण्याचं नवीन फिचर देण्यात आलयं.

टि्वटर

टि्वटरने वर्षा अखेरीस सर्वात मोठा दिलासा दिला. शब्द मर्यादेत वाढ केली. टि्वटरने आपली शब्द मर्यादा 140 वरून 280 केली. त्यामुळे मोठी बोतमी, वाक्य लिहणाऱ्यांची मोठी सोय झाली आहे. हल्ली ट्विटरवर अश्लील कंटेट खूप मोठ्या प्रमाणात जनरेट केला जातो. हा सगळा कंटेंट फेक अकाऊंट्सवरून जनरेट होतो. त्यातले बरेचसे फेक अकाऊंट्स मुलींच्या नावावर चालवले जातात. त्यामुळेच ट्विटरने नुकतेच 90,000 अकाऊंट डिलिट केले आहेत.

इन्स्टाग्राम

सेलिब्रिटींच्या लाडाचं इन्स्टाग्रामही यात मागे राहिलं नाहीये.  आत्तापर्यंत इन्स्टाग्राम किंवा फेसबुकवर पोस्ट केल्या जाणाऱ्या स्टोरीज‌नां चोवीस तासांची मर्यादा होती, पण आता इन्स्टाग्रामच्या लेटेस्ट अपडेटनंतर पोस्ट केल्या जाणाऱ्या स्टोरीज या वेगळ्या प्राइव्हेट स्पेसमध्ये सेव्ह होणार आहेत.

 स्काइप

६ वर्षांनंतर पहिल्यांदाच बदल केले. skype च्या नवीन  अपडेटमध्ये कंपनीने "Find", "Chat", आणि "Capture" यासारख्या ३ नवीन विंडोज आणल्या आहेत. "Find" च्या फिचर्समध्ये हवामान, पोल, GIF, शो तिकीट यासारखे ऑप्शन देऊन युजर्स आपल्या मोबाईलच्या कॉनटॅक्ट मधून शेअर करू शकतात.

स्नॅपचॅट

स्नॅपचॅटचे सीईओंच भारत खूप गरीब देश आहे आणि आमचं अॅप केवळ श्रीमंत देशांसाठी बनवण्यात आलयं, असं वादग्रस्त विधान केलं होतं. पण त्याचे परिणाम स्नॅपचॅटला आज भोगावे लागत आहेत.भारतीयांनी सोशल मीडियावरुन स्नॅपचॅटच्या सीईओंच्या वक्तव्याचा निषेध करुन, आपल्या मोबाईलवरुन हे अॅप अनइन्स्टॉल करत असल्याचं जाहीर केलं. एवढंच काय गुगल प्ले स्टोअरवर पूर्वी स्नॅपचॅटला पाच स्टारचं रेटिंग मिळत होतं.

'रॅनसमवेअर'चे वादळ

या वर्षात रॅनसमवेअर व्हायरसने भल्याभल्याना धडकी भरवली. भारतातील सर्वात मोठं बंदर असलेल्या जेएनपीटीला रॅनसमवेअर व्हायरसचा फटका बसलाय. रॅनसमवेअर व्हायरसच्या अॅटॅकमुळे जेएनपीटी बंदराची कार्यप्रणाली ठप्प झाली होती.

तसंच युके, रशिया, फ्रान्स, स्पेनमध्ये या व्हायरसनं ग्राहक, मालवाहतूक, हवाई वाहतूक सेवा, तेल कंपन्यांवर हल्ला केला होता. भारताला या हल्ल्याची झळ बसली. हा व्हायरस 'पीटा' नावाच्या जुन्या रॅन्समवेअरचं अॅडव्हान्स्ड वर्जन होतं. पेट्यानं 20 प्रसिद्ध कंपन्यांमधील कम्प्युटर हॅक केले आणि कम्प्युटर अनलॉक करण्याच्या मोबदल्यात हॅकर्संनी 300 डॉलरची मागणी केली होती.

सोशल मीडियाचे बळी

फेसबुकवर पोस्ट टाकून आत्महत्या करण्याची संख्या चिंताजनक आहे. एप्रिलमहिन्यात अर्जुन भारद्वाज या तरुणाने मुंबईतील वांद्रे परिसरातील पंचतारांकित हाॅटेलमध्ये 19 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे त्यांने फेसबुकवर लाईव्ह व्हिडिओ करून आत्महत्या केली.

 एकंदरीतच काय तर  अनेक घटना-घडामोडींनी सोशल मीडिया गाजलं आणि अनेक घटना सोशल मीडियामुळेही घडल्यात.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Sat Sep 22 16:15:44 +0000 2018

समतेचा संदेश देणाऱ्या शाहू महाराजांच्या नगरीत धक्कादायक घटना... 13 वर्षांच्या मुलाची काढली नग्न धिंड... 'फॅण्ड्री'… https://t.co/T90cyE2omG
Jai Maharashtra News
Sat Sep 22 15:53:08 +0000 2018

पैसे मागण्यासाठी चाळीमध्ये आले होते तृतीयपंथी... मात्र त्यातील एका तृतीयपंथीने मात्र केली धक्कादायक गोष्ट... वाचा स… https://t.co/nspdlik02q

Facebook Likebox