Tuesday, 18 December 2018

फेसबुक-आधार लिंकवर अफवा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

सध्या सोशल मीडियावर फेसबुक युजर्सना आपले आधार कार्ड त्यांच्या फेसबुकला जोडणं अनिवार्य असल्याचे मेसेज व्हायरल होत आहे. मात्र, यामध्ये काहीही तथ्य नसल्याचं स्पष्टीकरण फेसबुक कडून देण्यात आले आहे. पीटीआयने यासंदर्भात बातमी दिली आहे. फेसबुक अकाऊंट आधार क्रमांकासोबत जोडण्याचा कोणताही विचार नसल्याचं फेसबुकने स्पष्ट केले आहे. आधार कार्डवरील नाव जर एखाद्या फेसबुक यूझरने ठेवलं, तर कुटुंबीयांना आणि मित्रांना त्या व्यक्तीला ओळखण सोपं जाईल, हा हेतू या मागे असल्याचं फेसबुकने स्पष्ट केलं.

 

नव्या यूझर्सना फेसबुकवर साईन अप कसं करावं, याची माहिती देणं, हा चाचणीचा उद्देश असल्याचं फेसबुकने सांगितलं. याचा अर्थ असा होत नाही की अकाऊंट आधार क्रमांकाशी लिंक करण्यात यावे आणि हे जरुरीचे ही नाही. आम्ही यूझर्सकडून कोणताही डेटा गोळा करत नाही. त्याचप्रमाणे साईन अप करताना आधार नाव टाकण्याची गरज नाही, असंही फेसबुककडून कळवण्यातं आलं आहे. फेक अकाऊंट्स ओळखण्यासाठी फेसबुकने हे पोऊल उचलल्याच म्हटलं जात आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य