Sunday, 20 January 2019

धोनी धवन, केदारच्या ‘त्या’ फोटोवरून चाहत्यांनी उडवली राहुलची खिल्ली

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

कॉफी विथ करण कार्यक्रमातील वादग्रस्त विधानांमुळे क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुल अडचणीत आले आहेत. महिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे या दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे करणसोबतची कॉफी हार्दिक आणि राहुलला चांगलीच महागात पडल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू आहे. एकीकडे हार्दिक आणि राहुलला कॉफी महागात पडली असताना दुसरीकडे माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी, शिखर धवनसोबत चहा घेत असतानाचा फोटो केदार जाधवने ट्विटरवर शेअर केला आहे.

केदार जाधवने काल म्हणजेच रविवारी धोनी आणि धवन सोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला. यामध्ये हे तिन्ही क्रिकेटपटू चहाचा आनंद घेताना दिसत आहे. एक कप चहा सर्वकाही ठिक करतो, असे केदारने या फोटोसोबत म्हटले आहे. या फोटोचा संबंध अनेकांनी थेट हार्दिक आणि राहुलच्या 'कॉफी विथ करण'शी जोडला आहे. केदारने धोनी आणि धवनसोबत चहा घेत हार्दिक आणि राहुलच्या 'कॉफी'वर निशाणा साधल्याच्या प्रतिक्रिया अनेक नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

जखमेवर मीठ चोळणं माहीत होते. पण इथे तर केदार जाधव जखमेवर चहा ओततो आहे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ट्विटरवर अनेकांनी या फोटोबद्दल भाष्य करताना दिल्या. तर ट्रोल करावे, तर केदारसारखे, अशी प्रतिक्रियाही एकाने दिली आहे. तर बरं झालं तुम्ही कॉफी प्यायला नाहीत, असे देखील एकाने म्हटले आहे. एक कप चहाने सर्व काही ठिक होतं. पण एक कप कॉफीमुळे सर्व काही बिघडतं, असा टोलादेखील एका ट्विटर युजरने लगावला आहे. चांगली मुले कॉफीला नाहीच म्हणतात, अशी प्रतिक्रियादेखील एका चाहत्याने दिली आहे.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card