Wednesday, 23 January 2019

रोहित-रितिकाला कन्यारत्न

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

भारताचा उपकर्णधार आणि फलंदाज रोहित शर्माच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. रोहित शर्माची पत्नी रितिकाने गोडंस मुलीला जन्म दिला आहे. रोहित शर्मा आणि रितिका सजदेह 13 डिसेंबर 2015 रोजी विवाहबद्ध झाले होते. लग्नाच्या 3 वर्षानंतर रोहित शर्मा-रितिका आई-बाबा झाले आहेत. रितिका सजदेवची चुलत बहिण आणि सोहेल खानची पत्नी सिमा खानने इन्स्टाग्रामवर माऊशी झाल्याची पोस्ट टाकली आहे. सिमाने रितिकाला टॅग करत ही पोस्ट टाकली आहे.

सर्कल ऑफ क्रिकेट या वेबसाईटने रोहित शर्मा बाबा झाल्याचे वृत्त दिले आहे. रोहित शर्मा किंवा रितिका यांच्याकडून अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत वृत्त आले नाही. रोहित शर्मा सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. तिसऱ्या कसोटीमध्ये भारताच्या विजयात रोहित शर्माचा मोठा वाटा होता.

रोहितने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कसोबत गेल्या आठवड्यात झालेल्या एका मुलाखतीत आपण बाप होणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. मायकल क्लाकसोबतच्या या मुलाखतीत बाबा होण्याच्या आपल्या भावनेबद्दल बोलताना रोहित म्हणाला की, ‘त्या क्षणाची मी फार आतुरतेने वाट पाहत आहे. तो क्षण आमचं आयुष्य बदलणारा असेल. जेव्हा सहकाऱ्यांनी मी ही गोष्ट सांगितली तेव्हा ते सरप्राइज झाले आणि नंतर हसायला लागले.’ असं रोहित शर्मा म्हणाला होता.

loading...

राशी भविष्य