Wednesday, 23 January 2019

शेन वॉर्नने मागितली भारतीय चाहत्यांची माफी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

पर्थच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलियातील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. आजपासून 14 डिसेंबरपासून सुरू झालेला हा सामना 18 डिसेंबरपर्यंत रंगणार आहे.

4 सामन्यांच्या मालिकेत भारत 1-0 ने आघाडीवर आहे. या परिस्थितीमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न याने या सामन्याबाबत भविष्यवाणी केली आहे. पण या माफीचे कारण त्याने कोणतीही चूक केली नसून त्याने या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा जिंकणार अशी भविष्यवाणी केली आहे.

शेन वॉर्न याने दुसऱ्या कसोटीसाठी दोनही संघांना शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटद्वारे त्याने दोनही संघाचा खेळ चांगला होवो असे म्हटले आहे. पण याबरोबरच त्याने भारतीय चाहत्यांची माफीदेखील मागितली आहे. वॉर्नच्या मते या सामन्यात पर्थच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा संघ भारतीय संघाचा धुव्वा उडवेल, असे म्हटले आहे.

या शिवाय, या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा सामन्यात 10 गडी बाद करेन, तर फिंच सामन्यात शानदार शतक ठोकेल अशी आशा देखील वॉर्नने व्यक्त केली आहे. पहिल्या कसोटीत स्टार्कने संबंध सामन्यात 5 बळी बाद केले होते. तर फिंचला केवळ 11 धावाच करता आल्या होत्या.

loading...

राशी भविष्य