Wednesday, 23 January 2019

हॉकी वर्ल्ड कप: भारताची कॅनडावर 5-1 ने मात

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

हॉकी वर्ल्ड कपच्या आजच्या सामन्यात भारताने कॅनडावर 5-1 ने विजय मिळवत उपान्तपूर्व फेरीत स्थान पक्के केले आहे.

सामन्याच्या सुरुवातीलाच भारताने 1-0 अशी आघाडी घेतली होती. या पहिल्या क्वार्टरमध्ये भारताला 3 पेनल्टी कॉर्नर मिळाले होते. पण त्यापैकी एकाचेच रुपांतर गोलमध्ये झाले. तिसऱ्या क्वार्टरमध्ये कॅनडाच्या सन फ्लोरिसने गोल केला तर चौथ्या क्वार्टरमध्ये भारताने निर्णायक गोल केले. 

2013 पासून आतापर्यंत भारताने कॅनडाविरुद्ध  6 सामने खेळले आहेत. त्यापैकी 4 सामने भारताने जिंकले, एक सामना हरला तर एक सामना अनिर्णित राहिला.

आजच्या सामन्यात 12 व्या मिनिटात पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रीनने भारतासाठी गोल डागला. तसेच  चिंगलसेना सिंह, अमित रोहिदास यांनी प्रत्येकी 1 तर ललित उपाध्यायने 2 गोल केले. 

loading...

राशी भविष्य