Wednesday, 23 January 2019

Ind Vs Aus 1st Test: भारताकडून ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यात चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवसअखेर भारताने  9 बाद 250 धावांचा समाधानकारक पल्ला गाठला होता. 

पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाना धोबीपछाड दिला. मात्र ट्रेव्हिस हेडने यावेळी भारतासाठी डोकेदुखी केले होते. हेडच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसअखेर 7 बाद 191 अशी मजल मारली आहे.

  • इशांत शर्माने आरोन फिंचला शून्यावर बाद करत ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच धक्का दिला.
  • त्यानंतर फिरकीपटू आर. अश्विनने तीन बळी मिळवत ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले.
  • त्यावेळी पीटर हँड्सकॉम्ब संघासाठी धावून आला, त्याने पाच चौकारांच्या जोरावर ३४ धावा केल्या.
  • त्यानंतरही ऑस्ट्रेलियाचा डाव पूर्णपणे सावरलेला नव्हता.
  • त्यावेळी हेडने चिवट फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
  • हेडने सहा चौकारांच्या जोरावर नाबाद ६१ धावांची खेळी साकारली.
  • भारताकडून आर. अश्विनने भेदक मारा करत तीन बळी मिळवले.
  • त्याचबरोबर इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमरा यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

 

loading...

राशी भविष्य