Friday, 14 December 2018

Ind vs Aus 1st Test: चेतेश्वर पुजाराचं अविस्मरणीय झुंजार शतक

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

भारत विरूद्ध अॉस्ट्रेलिया कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजाराच्या संयमी खेळीने भारताचा डाव सावरला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना पुजाराला रोखण्यात अपयश आले आणि याचा फायदा घेत चेतेश्वर पुजाराने अविस्मरणीय शतकी खेळी केली.
पुजाराने शेवटच्या फलंदाजांना सोबत घेऊन भारताला पहिल्या दिवसअखेर 9 बाद 250 धावांचा समाधानकारक पल्ला गाठून दिला. दिवसाची अखेरची विकेट ही त्याचीच पडली. सामन्यानंतर त्याने बीसीसीआयकडे एक इच्छा व्यक्त केली.

पहिल्या दिवसाच्या खेळीबाबत पुजारा म्हणाला,'' प्रचंड गरम आणि आर्द्रता यामुळे येथे खेळणे आव्हानात्मक होते. भारतात आम्ही अशाच वातावरणात खेळत असलो तरी ऑस्ट्रेलियातील ऊन कडक होते. त्यामुळे मी आता आईस बाथ घेणार आहे. तसे मला फारसे आईस बाथ घ्यायला आवडत नाही, परंतु मी आज तो घेणार आहे. त्यानंतर मी चॉकलेट मिल्क शेक पिणार आहे."

http://www.bcci.tv/videos/id/7140/why-pujara-wants-a-milkshake-post-his-adelaide-ton

4 बाद 41 अशा दयनीय अवस्थेत सापडलेल्या भारतीय संघाच्या मदतीला पुजारा धावून आला. 246 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकार खेचून 123 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करून भारताचा डाव सावरला. मात्र दिवसाचा खेळ संपायला दोन षटके शिल्लक असताना पॅट कमिन्सने अप्रतिम क्षेत्ररक्षण करत पुजाराला धावबाद केले.

 

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card