Friday, 14 December 2018

गौतम गंभीरला किंग खानचा 'हा' सल्ला

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

भारतीय संघाचा डावखुरा फलंदाज तसेच अँग्री यंग मॅन म्हणून ओळख असलेला गौतम गंभीरने  एक ह्रदयस्पर्शी व्हिडिओ पोस्ट शेअर केला आहे.

या व्हिडिओत त्याने क्रिकेट जगताला अलविदा म्हटले आहे. 

आयपीएल सामन्यातील शाहरूखच्या कोलकाता नाइट राइडर्स या संघाचे गौतम गंभीर नेतृत्व करत होता. त्याने शाहरूखच्या संघाला दोनदा विजेतेपद मिळवून दिले आहे. त्यामुळे शाहरूख आणि गौतम गंभीर यांच्यात जवळीक वाढली होती.

 

srk3.jpg

 

असा होता किंग खान सोबतचा प्रवास - 

  • गंभीरने २०११ मध्ये केकेआर कडून खेळण्यास सुरुवात केली होती. 
  • त्याने दुसऱ्याच वर्षी म्हणजेच २०१२ मध्ये संघाला जेतेपद मिळवून दिले.
  • संघाच्या नेतृत्वाखालीच केकेआर संघाला २०१४ मध्ये दुसऱ्यांदा जेतेपद मिळवून दिले.

srk5.jpg

मात्र, त्याने आता सर्व क्रिकेट सामन्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर किंग खानने ट्वीट करत गौतम गंभीरला म्हटले आहे की, संघाला दिलेल्या प्रेमासाठी आणि नेतृत्वासाठी धन्यवाद. तू एक खास माणूस आहेस आणि परमेश्वर तुला नेहमीच आनंदी ठेवेल,आनंदी रहा... आणि थोडं हसत ही रहा. 

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card