Wednesday, 23 January 2019

भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

गुरूवारपासून सुरु होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ  बीसीसीआयने अंतिम 12 खेळाडूंची घोषणा केली आहे. अॅडलेड येथे होणाऱ्या या सामन्यात भारताने रोहित शर्माच्या पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. पण तो नक्की कोणत्या क्रमवारीत फलंदाजीला येईल हे उद्याच स्पष्ट होईल. पृथ्वी शॉला दुखापत झाल्यामुळे लोकेश राहुल आणि मुरली विजय यांना सलामीला संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियानेही अंतिम 11 खेळाडूंची नावे जाहिर केली आहेत.

पहिल्या कसोटीसाठी असे असतील संघ

भारत

 • विराट कोहली
 • अजिंक्य रहाणे
 • लोकेश राहुल
 • मुरली विजय
 • चेतेश्वर पुजारा
 • रोहित शर्मा
 •  हनुमा विहारी
 • रिषभ पंत
 • आर अश्विन
 • मोहम्मद शमी
 • इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमरा.

ऑस्ट्रेलिया

 • मार्कस हॅरिस
 • अॅरोन फिंच
 • उस्मान ख्वाजा
 • शॉन मार्श
 • पीटर हॅण्ड्सकोम्ब
 • ट्रॅव्हीस हेड
 • टीम पेन
 • पॅट कमिन्स
 • मिचेल स्टार्क
 • नॅथन लियॉन
 • जोश हेझलवूड. 
loading...

राशी भविष्य