Friday, 14 December 2018

#WomensT20 आज भारत पाकिस्तान आमनेसामने

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

कॅप्टन हरमनप्रीत कौरच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर भारताने न्यूझीलंडवर मात करून महिलांच्या टी-20 वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेला धडाक्यात सुरुवात केली आहे. आता रविवारी भारताची पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी गाठ पडणार आहे. या लढतीतही भारताचे पारडे जड आहे. प्रोव्हिडन्स स्टेडियममध्ये ही लढत होईल.

क्वालालंपुरमध्ये जूनमध्ये झालेल्या महिलांच्या आशिया कप टी-20 स्पर्धेत भारत-पाकिस्तान हे संघ आमनेसामने आले होते. त्यात भारताने बाजी मारली होती, अशाच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी भारतीय महिला संघ उत्सुक आहे. भारतीय संघाने वर्ल्ड कपला धडाक्यात सुरुवात केली आहे. सलामीच्या लढतीत भारताने न्यूझीलंडवर 34 धावांनी मात केली.

भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. कॅप्टन हरमनप्रीत कौरने दमदार शतक झळकावले आहे. जेमिमा रॉड्रीग्जनेही तिला मोलाची साथ देत अर्धशतक झळकावले. 3 बाद 40 अशी अवस्था झाली असताना दडपणाखाली हरमनप्रीत-रॉड्रीग्ज यांनी शतकी भागीदारी रचली. आघाडीच्या फळीतील तानिया भाटिया आणि स्मृती मानधना यांना मात्र सलामीच्या सामन्यात छाप पाडता आली नाही.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card